Ola आणि Ather ला विसरुन जाल! बाजारात येतीये 236 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Simple One Electric Scooter: बंगळुरुमधील स्टार्ट-अप सिंपल एनर्जी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर (Electric Scooter) काम करत आहे. लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली जाणार असून ओला आणि अथरला मोठी स्पर्धा देण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 27, 2023, 03:20 PM IST
Ola आणि Ather ला विसरुन जाल! बाजारात येतीये 236 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर title=

Simple One Electric Scooter: वाहनप्रेमींमध्ये आता इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) क्रेझ वाढताना दिसत आहे. तुम्हीदेखील जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर पुढच्या महिन्यात तुम्हाला आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. बंगळुरुमधील स्टार्ट अप सिंपल एनर्जीने पुढील महिन्यात बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Simple One ला लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 2021 मध्ये पहिल्यांदा ही गाडी समोर आणली होती. त्यावेळी ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचा दावा करण्यात आला होता. 

कंपनी गेल्या बऱ्याच काळापासून ही स्कूटर लाँच करण्याची तयारी करत होती. पण अखेर कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे.

"जेव्हा आम्ही Simple One ची निर्मिती करण्याचा विचार केला, तेव्हा ग्राहकांनी जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचं आमचं ध्येय होतं. गेल्या 2 वर्षात आम्ही सर्वाधिक मागणी असणारे फिचर्स आणि गरजा लक्षात घेत आपल्या या स्कूटरची चाचणी केली आहे, जेणेकरुन चांगलं प्रोडक्ट मिळेल," असं सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि सीईओ सुहास राजकुमार यांनी सांगितलं आहे.

कंपनी गेल्या दोन वर्षांपासून या स्कूटरची चाचणी करत असल्याने त्यात अनेक नवे बदल केले गेले असावेत. सध्या कंपनीच्या अधिकृत बेवसाईटवर असणाऱ्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. ही मोटर 72Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 4.8kWh च्या क्षमतेचं लिथियम-ऑयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जी सिंगल चार्जमध्ये 236 किमीची रेंज देते. 

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत सिंपल वन ड्रायव्हिंग रेजमध्ये सर्वोत्तम आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आल्यानंतर Ola S1 आणि Ather 450X  यांना जोरदार टक्कर देईल असं बोललं जात आहे. Ola S1 आणि Ather 450X अनुक्रम 181 किमी आणि 146किमीचा ड्रायव्हिंग रेज देते. या स्कूटरची किंमत किती असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे याची किंमत इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत किती असेल हे पाहावं लागणार आहे.