मुंबई : भारतातच काय तर जगभरात Whatsapp खूप लोक प्रिय आहे, लोकं त्यावर पर्सनल किंवा ऑफसचे सगळे मेसेज पाठवतोय. जरी कंपनीने अनेक वेळा सांगितले आहे की त्यांचे खाजगी संदेश इतके सुरक्षित आहेत की, कंपनी किंवा इतर कोणीही त्याला वाचू शकत नाही. परंतु तरीही वारंवार हा प्रश्न उपस्थित राहातो की, तुमचे मेसेज किंवा चॅट खरच सुरक्षीत आहेत?
नवीन अहवाल Whatsappचा हा दावा फेटाळतो. Propublica ने दिलेल्या अहवालात असे सुचवले आहे की, फेसबुक खाजगी संदेश WhatsApp वाचू आणि शेअर करू शकते. अहवालात कोणत्या गोष्टी बाहेर आल्या आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हजारहून अधिक लोकांना कॉट्रॅक्टवर ठेवले आहे. जे ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूरमधील कार्यालयांमध्ये बसले आहेत आणि ते व्हॉट्सअॅपचे तुमचे खासगी संदेश ट्रॅक करतात.
या ऑफिसमधून कर्मचारी लाखो वापरकर्त्यांचे कंटेन्ट तपासतात. हे कर्मचारी फेसबुक सॉफ्टवेअर वापरणाऱ्या वापरकर्त्यांचे खाजगी संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतात. यासाठी कंपनी त्यांना पगारही देते.
या अहवालात व्हॉट्सअॅपचा दावा फेटाळला
जर कोणी व्हॉट्सअॅपवर साइन अप केले, तर कंपनी वापरकर्त्याला सांगते की त्यांचे मेसेज बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. कंपनी आता याची जाहिराच देखील करते. यामध्ये कंपनी दावा करते की, हा मेसेज इतका खाजगी ठेवण्यात आला आहे की, कंपनीसुद्धा ते पाहू शकत नाही. पण अहवालाने हा दावा फेटाळला आहे.
Whatsapp चे डायरेक्ट ऑफ कम्युनिकेशन्स कार्ल वूग यांनी कबूल केले की, ऑस्टिन आणि इतर जागेवरील कॉट्रॅक्टवर असलेली आमची टीम गैरवर्तन करणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेजना ते रिव्यू करतात.
परंतु त्यांना म्हटले आहे की, ही टीम फक्त त्यात मॅसेजला रिव्यू करते ज्यामुळे कोणाला त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याचे नुकसान होत आहे. या कंटेन्टमध्ये फसवणूक, चाईल्ड पोर्नपासून ते दहशतवादी षडयंत्रापर्यंतच्या गोष्टींचा समावेश असू शकतो आणि त्या दृष्टीने हे केले जाते.
व्हॉट्सअॅप मेसेज एन्क्रिप्ट केलेले असतात, म्हणून ते वाचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरल्या जातात. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही हे शक्य आहे. जर वापरकर्त्याने कोणत्याही कंटेन्टला रिपोर्ट केले असेल, तर अशा मेसेजचा कंटेन्ट तपासला जातो.