नवी दिल्ली : व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय.
सप्टेंबर २०१६ मध्ये व्हॉटसअपनं नवी पॉलिसी जाहीर करत आपल्या युझर्सचा डाटा 'फेसबुक' आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी करू शकतं, अशी अट घातली होती. याचा विरोध करत कर्मण्य सिंह सरी आणि श्रेया शेठी यांनी एक याचिका दाखल केली होती. ही नवी पॉलिसी म्हणजे युजर्सच्या गोपनीयता धोरणाव गदा असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
SC asks FB & WhatsApp to file detailed affidavit within 4 weeks, to give assurance that they won't transfer data of consumers to third party
— ANI (@ANI) September 6, 2017
हायकोर्टानं या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर ती सुप्रीम कोर्टात पोहचली होती. यावर सुनावणी दरम्यान व्हॉटसअपनं कोर्टात स्पष्टीकरण दिलंय. आपली पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकसोबत युजर्सचा केवळ फोन नंबर, मोबाईल डिव्हाईसचा प्रकार - रजिस्ट्रेशन आणि लास्ट सीन शेअर केला जाईल, असं व्हॉटसअपनं म्हटलंय.
पुढच्या चार आठवड्यांत व्हॉटसअप आणि फेसबुकनं तपशील प्रतिज्ञापत्र दाखल करावं असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.