मुंबई : आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन ही गरज राहिली नसून सवय झाली आहे. स्मार्टफोनच्या अनेक समस्याही रोज बघायला मिळतात. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे स्मार्टफोन गरम होणे म्हणजेच ओव्हरहिटींगची समस्या.
ही एक सामान्य समस्या असली तरी त्याचा धोकाही मोठा आहे. यामुळे स्मार्टफोन इंटरनली डॅमेरजही होऊ शकतो. स्मार्टफोन गरम झाल्यामुळे बॅटरी फुटल्याच्या काही घटनाही नुकत्याच समोर आल्या आहेत. तसेच, काही स्मार्टफोन विमानात, दुकानात फुटले आहेत. या समस्येमुळे ग्राहकांना चांगलीच डोकेदुखी होत आहे. अनेकांना स्मार्टफोन फुटण्याची भीतीही सतावते आहे. चला आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन गरम होण्याबाबत काही गोष्टी सांगणार आहोत, त्यासोबतच ते कसे रोखाल याबद्दलही काही सांगणार आहोत.
सर्वातआधी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की, फोन गरम होणं, फोनमध्ये हीट निर्माण होणं आणि ओव्हरहीट यात काय फरक आहे. गेम खेळताना किंवा चार्जिंग करताना जास्तकरून फोन वार्म होतो. काही फोन हीटही होतात. स्मार्टफोनमध्ये ३५℃ आणि ४२℃ पर्यंत तापमान असणं सामान्य बाब आहे. मात्र त्यापेक्षा जास्त गरम होणं, हे अजिबात सामान्य नाहीये.
प्रोसेसर - जेव्हाही ओव्हरहीटींगची समस्या येते, तेव्हा त्यात प्रोसेसरचा सर्वात मोठा हात असतो. त्यासोबत स्नॅपड्रॅगन ८१० आणि ६१५ हीटिंगसाठी कारणीभूत मानले जातात. पण ओव्हरहीटींगच्या मागे हेच एक कारण नाहीये.
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्मार्टफोनचा वापर करत असाल, जसे की, मल्टीटास्किंग, हाय-एन्ड गेम्स इत्यादी. तर तुमचा स्मार्टफोन वार्म होणार हे नक्की.
Li-ion बॅटरीमध्ये हीटींगची समस्या ‘थर्मल रनअवे’ या गोष्टीमुळेही होते. यामुळे फोन हीटींग अधिक जास्त धोकादायक होतं. जर स्मार्टफोन मेटल बॉडीचा असेल तर अधिक हीट निर्माण होते.
फोनमध्ये नेटवर्क बरोबर नसेल किंवा सिग्नल वीक असेल, अशात जर तुम्ही अॅप्स डाऊनलोड केले तर फोन ओव्हरहीट होतो.
तुमचा फोन ओव्हरहीटपासून वाचवण्यासाठी तासनतास गेम खेळत राहणं थांबवावं लागेल. त्यासोबत जास्तवेळ व्हिडिओज बघणंही कमी करावं लागेल. त्या अॅप्सवर मल्टिटास्किंग करण्याचे टाळा, ज्यात अधिक प्रोसेसिंग पावर जाते. कधी कधी तुमच्या फोनची बॅटरी चांगली नसते. तुमचा स्मार्टफोन नेहमी नेहमी गरम होत असेल तर समजून घ्या की, नवीन बॅटरी घेण्याची वेळ आली आहे.