मुंबई : तुमचं एसबीआय बँकेत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची! कारण, तुम्हालाही बँकेच्या नावानं मेसेज आला असेल. 'प्रिय ग्राहक, तुमचे एसबीआय बँक डॉक्यूमेंट एक्सपायर झाले आहेत. तुमचे अकाऊंट ब्लॉक होईल. अकाउंट सुरू करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: असा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. एसबीआय खातेधारकांना अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करावा असं बँकेकडून सांगण्यात आल आहे. असा मेसेज बँकेकडून कोणत्याही खातेदाराला पाठवला नसल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मेसेजकडे दुर्लक्ष करा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.
A message in circulation claiming that your @TheOfficialSBI account has been blocked is #FAKE #PIBFactCheck
Do not respond to emails/SMS asking to share your personal or banking details.
If you receive any such message, report immediately at report.phishing@sbi.co.in pic.twitter.com/Y8sVlk95wH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 18, 2022
असे मॅसेजमुळे तुमचा डेटा लिक होण्याची शक्यता असते. सायबर भामटे तुमचा डेटा चोरून त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला असा मॅसेज आला असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे.
अनेकदा सायबर फसवणुकीतून ग्राहकांना लाखोंचा गंडा घालण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आजही विविध माध्यमातून हॅकिंग लिंक पाठवून हॅकर्स तुमचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे तुमच्या सोशलमीडिया अकाउंट असो किंवा इतर कोणत्याही एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. अन्यथा तुमची फसवणू होऊ शकते.