मुंबई: सॅमसंग कंपनीने एम सीरिज यशस्वीपणे मार्केटमध्ये चालत असल्याचं लक्षात घेऊन आता त्यामध्येच 5G फोन काढण्यासंदर्भात घोषणा केली आहे. सप्टेंबरपर्यंत हा फोन येईल असं सांगण्यात आलं आहे. सॅमसंग कंपनी M52 5G आणि F42 5G फोन भारतात सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या सॅमसंगमध्ये एक A सीरिजमध्ये 5G फोन आणण्यात आला आहे.
मोठी स्क्रीन आणि जबरदस्त कॅमेरा ही युझर्सही गरज ओळखून युझर फ्रेंडली फोन देण्यासाठी सॅमसंगने ही घोषणा केली आहे. विवो आणि ओप्पोला टक्कर देण्यासाठी आता सॅमसंग M सीरिजमध्ये लवकरच 5G फोन लाँच करणार आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत किती असेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Amazon Indiaवरील एका प्रमोशनल पेजच्या मते, Samsung Galaxy M32 5G भारतात 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येईल. हा फोन ऑनलाईन उपलब्ध असेल. फोनच्या फोटोसोबत त्याचं वैशिष्ट्यंही सांगण्यात आलं आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नुकताच भारतात लाँच करण्यात आलेला A22 5G फोनसारखाच हा फोन असणार आहे. 2 वर्षांच्या OS अपडेटसह Knox सुरक्षाही देण्यात आली आहे. M32 5G एक 6.5-इंच HD + TFT LCD पॅनल देण्यात आलं आहे. मीडियाटेक डाइमेंशन 720 SoC स्वयंचलित असेल. स्टोरेज व्हेरिएट कोणते असतील याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
Samsung Galaxy M32 5G to launch on August 25
HD+ Infinity-V Display
Dimensity 720 processor
48MP Quad Rear Camera
13MP front camera
5000mAh battery
15W Charging #GalaxyM325G pic.twitter.com/xiiL8WIIdS— Tech Updates (@Techupdate3) August 19, 2021
M32 5G फोनमध्ये क्वाड्रा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 MP प्रायमरी सेंसर 8 MP अल्ट्रा वाइड, 5 MP मॅक्रो शूटर 2 MP डेप्थसह कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 13 MP स्नॅपरचा वापर युझर्स करू शकतात. याशिवाय 3.5 mm हेडफोन जॅक, 5000 mAh बॅटरीसोबत 15 वॅटचा चार्जर मिळणार आहे. यामध्ये अॅन्ड्रॉइड 11 व्हर्जन अपडेट देण्यात आलं आहे.