मोफत फोन वापरा; 'सॅमसंग'ची भन्नाट ऑफर

'अॅपल' आणि 'सॅमसंग' या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. या दोन्ही स्पर्धकांनी एकाचवेळी आपले सर्वात महागडे फोन बाजारात आणले आहेत. 

Updated: Nov 24, 2017, 07:18 PM IST
मोफत फोन वापरा; 'सॅमसंग'ची भन्नाट ऑफर  title=

मुंबई : सॅमसंगने 'गॅलेक्सी एस 8' आणि अॅपलनं 'आयफोन X' हे फोन एकाच वेळी लाँच केले. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल, यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा आहे.

'अॅपल' आणि 'सॅमसंग' 

'अॅपल' आणि 'सॅमसंग' या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. या दोन्ही स्पर्धकांनी एकाचवेळी आपले सर्वात महागडे फोन बाजारात आणले आहेत. 

अॅपलला जबरदस्त टक्कर

सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी अत्यंत मार्मिक जाहिरातबाजी करून अॅपलला कोपरखडी लगावली होती. या फटकेबाजीतून अॅपल बाहेर येत नाही, तोच आपल्या स्पर्धकाचे कायमचे ग्राहक आपल्या कंपनीकडे वळवण्यासाठी, सॅमसंगने नवीन शक्कल लढवली आहे.

सॅमसंगची भन्नाट ऑफर 

दक्षिण कोरियाच्या ग्राहकांसाठी सॅमसंगनं भन्नाट ऑफर दिली आहे. या अॅपल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, चक्क महिनाभरासाठी मोफत फोन वापरण्याची संधी सॅमसंगनं दिली आहे. अॅपलच्या ग्राहकांना नोंदणी शुल्क भरून महिनाभरासाठी सॅमसंगचा 'गॅलेक्सी एस 8' फोन वापरता येणार आहे. 

अॅपल प्रेमींना जर तो फोन आवडला

महिनाभर फोन वापरून झाल्यानंतर अॅपलच्या 'प्रामाणिक' ग्राहकांना जर तो फोन आवडला, तर ते कंपनीकडून विकत घेऊ शकतात. फोन घेण्याचा निर्णय पक्का झाला की, सॅमसंगकडून या ग्राहकांना एक आकर्षक गिफ्ट देखील देण्यात येणार आहे.

जर फोन आवडला नाही तर...

जर फोन आवडला नाही तर महिनाभरानंतर तो परत करण्याची संधाही ग्राहकांना आहे. अॅपलच्या प्रेमी ग्राहकांचं मन इतर कंपन्यांकडे वळवणं तसं कठीण, पण, सॅमसंगने देऊ केलेल्या या नव्या ऑफरमुळे अॅपलची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे. मात्र पण सध्या तरी ही ऑफर दक्षिण कोरियाच्या ग्राहकांसाठीच आहे.