उष्णतेपासून सुटका हवी असेल, तर घरी आणा कमी किंमतीतील 'हा' टेबल AC

एसीचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो किंवा काहींच्या घरी एसी लावण्यासाठी जागा नसते. ज्यामुळे कितीही वाटलं तरी सगळ्यांनाच एसीचा पर्याय खुला नसतो.

Updated: Apr 27, 2022, 06:36 PM IST
उष्णतेपासून सुटका हवी असेल, तर घरी आणा कमी किंमतीतील 'हा' टेबल AC title=

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकांनी वेगवेगळ्या पर्यायांना शोधण्यासाठी सुरुवात केली आहे. ऊन्हापासून वाचण्यासाठी बरेच लोक एसी लावतात. तर काही लोक एखाद्या एक्ट्रा पंख्याची सोय करतात, ज्यामुळे त्यांना या उष्णतेपाहून थोडी का होईना पण सुटका मिळते. परंतु बाहेर हवामान देखील उष्णता असल्यामुळे पंख्यामुळे आपल्याला हवा तसा थंडावा मिळत नाही. त्यामुळे अशा वेळी एसीच बरा असं बहुतेकांना वाटतं.

परंतु असे असले तरी, एसीचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो किंवा काहींच्या घरी एसी लावण्यासाठी जागा नसते. ज्यामुळे कितीही वाटलं तरी सगळ्यांनाच एसीचा पर्याय खुला नसतो.

परंतु आता टेन्शन संपलं. तुम्ही जास्त पैसे खर्च न करता घरी एसी आणू शकता. हा एसी आकाराने फारच छोटा आहे. ज्याचा आकार बॉक्ससारखा आहे आणि तुम्ही ते हाताने उचलून कुठेही नेऊ शकता.

हे कमी किमतीचे टेबल एसी आहे. तुम्ही ते कुठेही ठेवू शकता. ऑफिसचे काम करताना टेबलावर किंवा झोपताना बेडजवळ देखील याला ठेवू शकता.

हे यूएसबी केबलद्वारे चालू केले जाऊ शकते. तुम्ही हा पोर्टेबल एसी कमी, मध्यम किंवा हाय वर चालवू शकता. ते ह्युमिडिफायर आणि प्युरिफायर म्हणूनही काम करते.

उत्कृष्ट कूलिंग देते

हे त्याच्या कूलिंग रेंजमध्ये खूप उत्कृष्ट आहे. खोलीत कुठेही बसवा, ते काही मिनिटांत संपूर्ण रुम देखील थंड करु शकते. त्याचा आकारही खूप लहान आहे. जर तुमच्या घरात जास्त जागा नसेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

किंमत खूप कमी

ते बाजारात सहज उपलब्ध होईल. जर तुम्हाला हे उत्पादन ऑनलाइन खरेदी करायचे असेल, तर ते Amazon वर रु.829 मध्ये खरेदी करता येईल. अनेक कंपन्यांनी हा पोर्टेबल एसी लॉन्च केला आहे. हा एसी तुम्हाला 800 ते 1500 रुपयांमध्ये मिळेल.