5000mAh बॅटरीचा सर्वांत स्वस्त Smartphone लॉंच

खरंच इतका स्वस्त मिळतोय हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स 

Updated: Sep 5, 2022, 09:43 PM IST
5000mAh बॅटरीचा सर्वांत स्वस्त Smartphone लॉंच  title=

मुंबई : दररोज अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात. असाचं एक स्मार्टफोन लॉंच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत खुपचं कमी आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमधला हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.  

Poco M5 भारतात लॉन्च झाला आहे. हा Poco एम-सीरीज फोन वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉचसह येतो. या फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम सह येतो.या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. त्याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Poco M5 ची विक्री 13 सप्टेंबरपासून सुरू होईल. हा फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल.हा स्मार्टफोन ब्लू, पोको यलो आणि पॉवर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. 

किंमत किती
Poco M5 ची भारतात किंमत रु. 12,499 पासून सुरू होते. ही किंमत त्याच्या बेस व्हेरियंटसाठी आहे. यात 4GB रॅमसह 64GB अंतर्गत मेमरी आहे. त्याच्या दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

फिचर्स

  • स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी
  • Poco M5 मध्ये 6.58-इंच फुल-HD + IPS LCD स्क्रीन 
  • स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले 
  • स्मार्टफोन ऑक्टा-कोर 6nm MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येतो
  • या फोनमध्ये 6GB रॅम ते 28GB स्टोरेज 
  • ट्रिपल कॅमेरा सेटअप, प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर 
  • स्मार्टफोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.