Maruti च्या या एसयूव्हीने Tata Nexon ला टाकलं मागे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मारुतीच्या गाड्यांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Updated: Sep 5, 2022, 06:54 PM IST
Maruti च्या या एसयूव्हीने Tata Nexon ला टाकलं मागे,  जाणून घ्या फीचर्स आणि किंमत title=

Maruti Brezza Bookings: मारुतीच्या गाड्यांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. नुकतंच लाँच झालेल्या मारुतीच्या सेकंड जनरेशन ब्रेझाने (Maruti Brezza) टाटा नेक्सॉनला (Tata Nexon) मागे टाकलं आहे. ही गाडी जूनमध्ये 7.99 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. बाजारात लाँच झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात एकूण 15,193 युनिट्स विक्री झाली आहे. त्यामुळे टाटा नेक्सॉनच्या तुलनेत देशात सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही झाली आहे. ऑगस्टमध्ये नेक्सॉनच्या एकूण 15085 युनिट्स आणि ब्रेझाच्या 15,193 युनिट्सची विक्री झाली. याशिवाय ब्रेझाला चांगली बुकिंग मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला नवीन 2022 मारुती ब्रेझाचे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहे.

मारुती ब्रेझा एसयूव्ही मॉडेल LXi, VXi, ZXi आणि ZXi+ चार ट्रिममध्ये येते.  यात 1.5L K15C पेट्रोल इंजिन आहे. इंजिन त्याच्या 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स प्रकारांमध्ये 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मारुती ब्रेझाच्या मॅन्युअल प्रकारांची किंमत 7.99 लाख ते 12.46 लाख रुपये आहे. याशिवाय पाच ऑटोमॅटिक प्रकार VXi, ZXi, ZXi ड्युअल-टोन, ZXi+ आणि ZXi+ ड्युअल-टोनमध्ये उपलब्ध आहेत. ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत अनुक्रमे रु. 10.96 लाख, रु. 12.36 लाख, रु. 12.52 लाख, रु. 13.80 लाख आणि रु. 13.96 लाख आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

लवकरच मारुती ब्रेझा सीएनजी प्रकारात लाँच करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे मॉडेल सध्याच्या पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किटसह सुसज्ज असेल. सीएनजी मॉडेल नियमित मॉडेलपेक्षा अधिक इंधन कार्यक्षम असेल. तथापि, त्याची पॉवर आणि टॉर्कचे आकडे किंचित कमी असू शकतात, जसे की इतर कारच्या सीएनजी मॉडेलमध्ये देखील दिसून येते.