महागडा 5G स्मार्टफोन फक्त 7 हजार रुपयात, ही Diwali Offer तुमच्या कामाची

दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या प्रोडक्टवर आकर्षक सूट मिळते. ऐन सणासुदीच्या काळात महागड्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांची चांदी होते. फ्लिपकार्ट या ऑनलाइन साइटवर दिवाळी सेल सुरु झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर महागड्या वस्तू स्वस्तात मिळत आहे. 

Updated: Oct 12, 2022, 06:26 PM IST
महागडा 5G स्मार्टफोन फक्त 7 हजार रुपयात, ही Diwali Offer तुमच्या कामाची title=

Diwali Sale 2022: दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या प्रोडक्टवर आकर्षक सूट मिळते. ऐन सणासुदीच्या काळात महागड्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांची चांदी होते. फ्लिपकार्ट या ऑनलाइन साइटवर दिवाळी सेल सुरु झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर महागड्या वस्तू स्वस्तात मिळत आहे. जर तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 35 हजारांचा 5 जी स्मार्टफोन तुम्हाला अवघ्या 7 हजार रुपयात मिळणार आहे. POCO F4 5G नं स्मार्टफोन जबरदस्त ऑफर दिली आहे. यामुळे तुमच्या पैशांची बचत होणार आहे. 

POCO F4 5G या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये इतकी आहे. 27 टक्के डिस्काउंटसह हा फोन 25,499 रुपयांना विकला जात आहे. त्याचबरोबर यावर मजबूत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनवर 16900 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 8599 रुपये इतकी होते. त्याचबरोबर तुम्ही अॅडमिट कार्ड ऑफिसचा लाभ देखील घेऊ शकता. यामुळे 1000 ते 2000 रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 7000 रुपयात घेऊ शकता. 

Flying Taxi! चिनी कंपनीने दुबईमध्ये केली इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची चाचणी, वाहतूक कोंडीतून होणार सुटका

POCO F4 5G स्मार्टफोनमध्ये युनिक फीचर्स आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 800 प्रोसेसर आहे.