आता पेटीएमचे डिजिटल ATM

नोटबंदीच्या निर्णयानंतर मोबाईल वॉलेट बॅंकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले पेटीएम आता लवकरच नवी सेवा देणार आहे. या नव्या सेवेची मंगळवारी सुरूवातही झाली. पेटीएम आता डिजिटल एटीएम सुविधा देण्यासाठी सज्ज होत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 28, 2017, 11:37 PM IST
आता पेटीएमचे डिजिटल ATM title=

नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयानंतर मोबाईल वॉलेट बॅंकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले पेटीएम आता लवकरच नवी सेवा देणार आहे. या नव्या सेवेची मंगळवारी सुरूवातही झाली. पेटीएम आता डिजिटल एटीएम सुविधा देण्यासाठी सज्ज होत आहे.

अर्थमंत्री जेटलींनी केले पेटीएमच्या डिजिटल एटीएमचे उद्घाटन

नव्या सेवेचा शुभारंभ करताना पेटीएमने डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून पुढच्या दोन वर्षांमध्ये 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे उद्ष्ट असल्याची घोषणाही केली.  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बॅंकेचे औपराचारिकरित्या उद्घाटन केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले, आर्थिक व्यवहारांच्या माध्यमात नवे बदल होत असताना काही खासदार आपल्या मतदारसंघात बॅंकांची शाखा व्हावी अशी मागणी करतात. याच वेळी आपले डिजिट व्यवहारांची कॅशलेश इकॉनॉमी आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, आता कोणताही व्यक्ती तक्रार करत नाही की, आपल्याजवळ बॅंकींग सेवा उपलब्ध नाही असेही जेटली म्हणाले.

पेटीएमच्या एटीएममार्फत उभारणार 5 लाक टच पॉईंट

दरम्यान,  पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा या वेळी म्हणाले, पेटीएम पेमेंट्स बॅंकेचे एक लाख टच प्वाइंट्स बनले आहेत. तसेच, ही संख्या वाढून 10 लाखांवर नेण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली आहे, असेही शर्मा यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, पेटीएमच्या माध्यमातून पुढच्या दोन वर्षांत 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाईल. विद्यामान आर्थिक वर्षात 1700 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहितीही शर्मा यांनी या वेळी दिली.