15 जूनपासून वनप्लसच्या 'या' फोनचा सेल सुरु

हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. 

Updated: Jun 13, 2020, 02:45 PM IST
15 जूनपासून वनप्लसच्या 'या' फोनचा सेल सुरु title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन ब्रँड वनप्लसने (Oneplus) दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस 8 प्रो 5जी स्मार्टफोनचा सेल 15 जूनपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. वनप्लस 8 प्रो 5 जी स्मार्टफोनचा सतत पुरवठा करण्याचं आमचं लक्ष्य असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या उत्पादनाचा साठा कमी असल्यामुळे आम्ही मर्यादित विक्रीमध्ये स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.

भारतात वनप्लस 8 प्रो 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 इतकी आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.

वनप्लस 8 प्रो 6.78 इंची क्यूएचडी प्लस फ्लूड डिस्प्लेसह 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह लॉन्च झाला आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 55 5जी मोडेम, आरएफ सिस्टमसह स्नॅपड्रॅगन 865 चिप सपोर्टसह स्मार्टफोन बाजारात आला आहे.