ड्युएल सिमकार्डासहीत 'नोकिया १३०' लॉन्च

नोकिया कंपनीनं आपला 'नोकिया १३०' हा खिशाला अगदी सहज परवडणारा फिचर फोन भारतात लॉन्च केलाय. 

Updated: Aug 31, 2017, 06:45 PM IST
ड्युएल सिमकार्डासहीत 'नोकिया १३०' लॉन्च title=

नवी दिल्ली : नोकिया कंपनीनं आपला 'नोकिया १३०' हा खिशाला अगदी सहज परवडणारा फिचर फोन भारतात लॉन्च केलाय. 

नोकिया १३० हा फोन विकत घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजिकच्या रिटेल स्टोअरमध्ये संपर्क साधावा लागेल. या फोनची किंमत आहे केवळ १५९९ रुपये...

आकारानं छोटा असलेला हा फोन तुमच्या शर्टाच्या खिशात अगदी सहज मावेल. यामध्ये इनबिल्ट एफएम रेडिओ आणि एमपी३ प्लेबॅक असेल. १.८ इंचाचा कलर स्क्रिन, ३२ जीबी मायक्रो एसडी कार्ड स्टोअरेज, ब्लू टूथ सपोर्ट आणि एलईडी टॉर्चलाईट असे फिचर्स यामध्ये तुम्हाला मिळतील.

महत्त्वाचं म्हणजे, या फोनमध्ये ड्युएल सिमकार्ड वापरता येतील. हा मोबाईल लाल, करडा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.