मुंबई : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या मोजक्या यादीत प्रामुख्याने ज्यांचे नाव घेतले जाते त्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांच्या पत्नी नीता अंबानी या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. त्यांची सकाळची सुरुवात होते ती ३ लाख रुपयांच्या चहाने. मात्र, आता त्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. चैनीची वस्तू खरेदी करणे त्यांचा शौक दिसत आहे. त्यांच्याकडील मोबाईलची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
ऐश आराम जीवन जगणाऱ्या नीता अंबानींची आवड खूप शाही आहे. त्यांच्या साड्या, घड्याळ, हॅंडबॅग, फुटवेअर प्रत्येक वस्तू हटके असते. स्मार्ट दुनियेत वावरणाऱ्या नीता अंबानी या टेक्नॉलजीच्या जमान्यात अधिक स्मार्ट आहेत. त्यांच्याकडे गॅझेटही शानदार आणि हटके यात शंका नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी आणि यशस्वी बिझनेसवुमन अशी नीता अंबानी यांची ओळख आहे. त्या विलासी आणि शौकीन आहेत. त्यांच्या लक्झरी शौकची कल्पना म्हणजे त्यांच्या ३ लाख रुपयांच्या चहावरूनच येते. गतवर्षी त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली होती.
नीता अंबानी यांची आयपीएलमध्ये स्वतःची टीम मुंबई इंडियन्स आहे. त्या चिअर करताना आपल्याला दिसल्या आहेत. त्या कोणता फोन वापरतात, त्याची किंमत किती असेल, याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल. शाही शौकीन असणाऱ्या नीता यांच्याकडे टेक्नॉलजीच्या जमान्यात हटके फोन आहे. या फोनची किंमत ऐकून तुम्हचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. जगातील सर्वात शानदार फोनपैकी एक फोन त्या वापरतात.
या फोनच्या किमतीत एखादे खासगी मालकीचे जेट विमान खरेदी करता येईल. 'एशियानेटन्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, नीता अंबानी या 'फॉल्कन सुपरनोटा आयफोन ६ पिंक डायमंड' हा फोन वापरतात. ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३१५ कोटी इतकी या फोनची किंमत असल्याचं सांगितलं जाते. २०१४ मध्ये हा फोन लॉन्च झाला होता.
फोनशिवाय त्या जगातील सर्वात महागडी हॅंडबॅग देखील वापरतात. ३० ते ४० लाख इतकी त्यांच्या हॅंडबॅगची किंमत बोलले जाते. याशिवाय जगातील १०सर्वात महागड्या घरांमध्ये या जोडीच्या घराची गणना होते.
- २४ कॅरेट सोन्याचा फोन असून तो पिंक गोल्डपासून बनविण्यात आलाय.
-या स्मार्ट फोनला हॅक करण्याचा प्रयत्न झाला तरीही मालकाला अलर्ट जातो
-फोनवर प्लॅटिनमची कोटिंग असल्यामुळे हा फोन तुटू शकत नाही.
-लिमिटेड एडिशन असलेल्या या फोनची निर्मिती कंपनी मागणीनुसार करते.
- २०१४ मध्ये हा फोन लॉन्च झालाय