मुंबई : मार्केटमध्ये सध्या अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण बजेट स्मार्टफोन घेताना अनेकवेळा संभ्रम निर्माण होतो. बहुतेक वेळा आपल्याला हवे असलेले स्मार्टफोन बजेटमध्ये बसत नसल्यामुळे हिरमोडही होतो. पण सध्या मार्केटमध्ये ५ हजार रुपयांपर्यंतचे चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
इंटेक्स ऍक्वा स्टार 4G
या स्मार्टफोनची किंमत ३,८६१ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये पाच इंचाचा आयपीएस डिसप्ले तसंच 1GB रॅम, 8GB इंटरनल मेमरी, 8 मेगापिक्सल कॅमेरा आणि 1GHZचा क्वाड प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 2000 MAH ची बॅटरी आहे.
झोलो इरा 1एक्स 4G
5 इंचाचा डिसप्ले असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 4,777 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम, 8GB इंटरनल मेमरी, 8 मेगापिक्सल कॅमेरा आणि 2500MAH ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनला अॅन्ड्रॉईड 6.0 व्हर्जन देण्यात आलं आहे.
इंटेक्स ऍक्वा 5.5 वीआर
ई कॉमर्स वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत 4,800 रुपये आहे. या स्मार्टफोनचा डिसप्ले 5.5 इंचाचा आहे तसंच 1GB रॅम, 8GB इंटरनल मेमरी आहे. फोनची बॅटरी 2800 MAH आहे. या स्मार्टफोनला अॅन्ड्रॉईड 6.0 व्हर्जन देण्यात आलं आहे.
इंटेक्स ऍक्वा अमेझ प्लस
5.5 इंचाचा डिसप्ले असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत आहे 4,599 रुपये. या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम, 8GB इंटरनल मेमरी, 5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला अॅन्ड्रॉईड 6.0 व्हर्जन देण्यात आलं आहे.
कार्बन ऑरा 4G
ई कॉमर्स वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत 5,225 रुपये आहे. या स्मार्टफोनचा डिसप्ले 5 इंचांचा आहे तसंच 1GB रॅम, 8GB इंटरनल मेमरी, 8 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 2150 MAH आहे.