मुंबई : इंडिया कावासकीने भारतात निंजा ४०० लॉंच केली. स्पोर्ट्स बाइकची आव़ असणाऱ्यांना लाइटवेट, शार्प लुकिंग, हाय परफॉर्मंन्स बाइकची अनेक दिवसांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. नव्या निंजा ४०० ला पहिल्यापेक्षा अधिक उत्तम बनविण्यासाठी खूप वेळ गेला. यामुळे ही बाईक आता जास्त पॉवर देत खूपच हलकी झाली आहे. निंजा ३०० ही नव्याने शिकणाऱ्यांसाठी बनविण्यात आली होती. निंजा ६५० अनुभवी रायडर्ससाठी बनवली होती. तर ३०० पासून ६५० सीसी पर्यंत स्पोर्ट्स बाईकच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा चांगला ऑप्शन असल्याचे बाइक लॉन्चवेळी इंडिया कावासकी मोर्टसच्या एमडींनी म्हटले. या बाईकची स्पर्धा थेट केटीएम आरसी ३९० आणि डोमिनर ४०० सोबत केली जात आहे.
#kawasaki #ninja400 pic.twitter.com/gCNfKA7dJR
— IndiaKawasaki (@india_kawasaki) April 2, 2018
३९९ सीसी चे इंजिन १०००० आरपीएम वर ४९ पीएस पॉवर
८००० आरपीएम वर ३८ एनएम चे टॉर्क जनरेट
लिक्विड-कूल्ड मोटर ३०० सीसी निंजाच्या तुलननेत १० पीएस जास्त पॉवर
४०० ग्रीन कलर
एप्रिल २०१८ पासून बुकिंग
किंमत ४.६९ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली )