मुंबई : नोकियाने गेल्या वर्षी नोकिया ३३१० हा स्मार्टफोन नव्या अवतारात लाँच केला होता. त्यानंतर या फोनचे ३जी आणि ४जी हे व्हर्जनही बाजारात आले होते. आता कंपनी पुन्हा एकदा २५ वर्षापूर्वीचा जुना Nokia 2010 हा फोन नव्या अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोन पहिल्यांदा १९९४मध्ये लाँच करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार नोकिया २५व्या वर्षपूर्तीनिमित्त Nokia 2010 नव्या अवतारात लाँच करणार आहे.
असं म्हटलं जातयं की या फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटीही देण्यात येईल. तसेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारखे अॅपही सपोर्ट करतील. यासाठी HMD ग्लोबल फेसबुकशी चर्चा करतेय. असंही म्हटलं जातंय. नोकिया २०१०ला नोकिया A10 यानावाने लाँच केले जाईल. हा फोन लाल, काळा आणि पिवळ्यात रंगात उपलब्ध होऊ शकतो.
४ एप्रिलला भारतात नव्या अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. एचएमडी ग्लोबलने नुकताच Nokia 6 (2018), Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco लाँच केलेत. याशिवाय Nokia 1 Android Oreo Go edition लाँच करण्यात आला ज्याची किंमत ५,४९९ रुपये आहे.