सेन्ट फ्रान्सिस्को : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल दिवसेंदिवस आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत आहे. सध्याच गुगलने एक नवे फिचर सादर केले आहे. फोटो शेअरींग आणि स्टोरेज सेवा हे गुगलचे नवे फिचर आहे. ज्यामुळे पाळीव कुत्रा, मांजर यांची ओळख होईल. यापूर्वी गुगल फक्त माणसांचे फोटो ओळखाण्यास सक्षम होतं.
गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले, "हे फीचर अधिकतर देशात लागू केले जात आहे. या फीचरमुळे आता तुम्ही आपल्या कुत्रे आणि मांजरांचे फोटो देखील टॅग करू शकता. फोटोला त्या प्राण्याचे नाव देऊ शकता. त्यामुळे सर्च मध्ये तुम्ही त्यांना पटकन शोधू शकाल. किंवा तुमच्या पेटसोबतचा तुमचा फोटो तुम्ही अगदी सहज शोधू शकाल."
त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पेट चा फोटो अल्बम, मुव्हीज किंवा फोटो बुक देखील बनवू शकता. २०१५ मध्ये गुगल फोटो सेवेची घोषणा केली जात होती. गुगल फोटो युजर्स १६ मेगापिक्सलचे फोटो आणि १०८० पी रिसोल्युशन व्हिडीओच्या स्टोरेजची सुविधा देत आहे.