मुंबई : आपल्या फोनवरून समोरच्या व्यक्तिला फोन लावायचा असल्यास फोनमध्ये सिमकार्ड हवे असते हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच, एका सीमवरून एकच नंबर वापरता येतो हेही अनेकांना माहिती असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, एकाच सीमवरून तुम्ही दोन नंबर वापरू शकता. ते सुद्धा अगदी फ्री...
तुम्हाला जर एका सीमवरून दोन नंबर वापरायचे असतील तर, तर सर्वप्रथम तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा. स्मार्ट फोन असल्यास तुम्हाला दोन नंबर वापरण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आपल्याला मोबाईलमध्ये केवळ एक अॅप इनस्टॉल करावे लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एकाच वेळी एकाच सीमवरून दोन नंबर वापरू शकाल.
तुम्हाला जर तुमच्या मूळ नंबरवरून फोन करायचा असेल तर, त्यासाठी नियमीत पद्धत वापरावी लागेल. पण, तुम्हाला फ्रीवाल्या नंबरवरून कॉल करायचा असेल तर, तुम्हाला अॅपच्या माध्यमातून कॉल करावा लागेल. अॅपमधून कॉल करतानाही तुम्हाला नेहमी असते तशीच कॉन्टॅक्ट नंबरची यादी येईल. ज्यातून तुम्ही आवश्यक तो नंबर निवडू शकाल. या नंबरवरून तुम्ही मेसेजही करू शकता.