Motorola Moto G71S : स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मोटोरोला आपला आणखी एक कमी बजेटवाला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. हा तगडा स्मार्टफोन असणार आहे. यात 50 MP चा कॅमेरा असून 8 रॅमसह 128 GB मेमरी यात असणार आहे. तसेच 1 टीबीपर्यंत याची मेमरी तुम्ही वाढवू शकता. तसेच हा फोन वजनाला हलका असणार आहे. हा फोन येत्या काही दिवसात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल तर थोडावेळ वाट पाहा.
मोटोचा Moto G71S हा स्मार्टफोन GSM, CDMA, HSPA, CDMA2000,LTE या तंत्रज्ञावर आधारित असणार आहे. हा 5G स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये 4 G आणि 3G ची कनेक्टिव्हिटी आहे. 6.6'' चा डिस्प्ले असणार आहे. हा वजनाला हलका असून याचे वजन 173 ग्रॅम आहे. सिम ड्युअल सिम (नॅनो-सिम, ड्युअल स्टँड-बाय) असणार आहे. आकर्षक डिझाइन याचे खास वैशिष्ट्ये आहे. Motorola Moto G71s चे आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना, गेम खेळताना किंवा ऑनलाइन चित्रपट पाहताना चांगल्या उच्च दर्जाचा फिल मिळेले आणि स्पष्ट दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
डिस्प्ले प्रकार AMOLED, 1B रंग, 120Hz असून याचा आकार 6.6 इंच, 104.0 cm2 ( स्क्रीन-टू-बॉडी रेशो) असणार आहे. तर रिजोल्यूशन 1080 x 2440 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ओएस अँड्रॉइड 12 वर चालणार आहे. चिपसेट क्वालकॉम SM6375 स्नॅपड्रॅगन 695 5G यात असणार आहे. यूएसबी टाइप-सी 2.0 चार्जस असून फास्ट चार्जिंग असणार आहे. तसेच यात सेन्सर फिंगरप्रिंट असणार आहे.
या फोनचे मोठे वैशिष्ट्ये म्हणजे यात 50 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा ट्रिपल 50 MP,असून 8 MP(अल्ट्रावाइड), आणि 2 MP(मॅक्रो) कॅमेरा यात असणार आहे. LED फ्लॅश, HDR, पॅनोरामा वैशिष्ट्ये आहे. तसेच सेल्फी कॅमेरा सिंगल 16 MP (अल्ट्रावाइड) आहे. Motorola Moto G71s चा कॅमेरा मागील बाजूस सिंगल कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये 50 MP + 8 MP + 2 MP कॅमेरा आहेत. समोर असताना, मोबाईलमध्ये 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामुळे तुम्ही काही आश्चर्यकारक सेल्फी क्लिक करु शकता.
साउंड लाउडस्पीकर आणि स्टिरिओ स्पीकरसह 3.5 मिमी जॅक असणार आहे. ड्युअल-बँड, Wi-Fi डायरेक्ट ब्लूटूथ 5.1 या सुविधा यात असणार आहेत. याची किंमत कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही. दरम्यान याची साधारण किंमत 21 हजार रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. हा फोन काळा, पांढरा या रंगात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.