तुमच्या फोनचं जातंय का सारखं नेटवर्क? वापरा 5 सोप्या ट्रिक्स

तुमच्या फोनमध्ये सतत जाणवतोय का नेटवर्कचा प्रॉब्लेम? वापरा या सोप्या ट्रिक्स

Updated: Feb 28, 2022, 09:21 PM IST
तुमच्या फोनचं जातंय का सारखं नेटवर्क? वापरा 5 सोप्या ट्रिक्स title=

मुंबई : तुम्हालाही कॉल ड्रॉप किंवा नेटवर्कची समस्या जाणवते आहे का? थोड्या वेळानं फोनचं नेटवर्क जात असल्याची समस्या तुम्हालाही जाणवत आहे का? तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरून सतत जाणाऱ्या नेटवर्कची समस्या सोडवू शकता. 

Airplane Mode
आपल्या फोनमध्ये Airplane Mode हा पर्याय असतो. तुम्हाला जर नेटवर्क मिळत नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता. आपल्या फोनमध्ये Airplane Mode सुरू करा आणि पुन्हा काही सेंकदात हा मोड बंद करा. हा पर्याय वापरल्यानंतर बऱ्यापैकी तुमची समस्या दूर होऊ शकते. 
 
Restart 
जेव्हा सतत नेटवर्क न येण्याचा किंवा जाण्याची समस्या जाणवत असेल अशावेळी तुम्ही तुमचा फोन Restart करू शकता. फोन हँग झाला असेल तरी देखील तुम्ही हा पर्याय निवडू शकता. पावर बटण लाँग प्रेस केल्यानंतर तुम्हाला रिस्टार्टचा पर्याय मिळेल. त्यानंतर तुमच्या फोनमधील नेटवर्कचा प्रश्न सुटेल. 

SIM कार्ड
नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही वरील सर्व पर्याय वापरून देखील प्रश्न सुटत नसेल तर फोनमधील सिमकार्ड एकदा काढून पुन्हा फोनमध्ये टाका. त्यामुळे नेटवर्कचा प्रश्न सुटेल. 

नेटवर्क सेटिंग
आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये नेटवर्कचा पर्याय असतो. Settings > General > Reset > Reset Network Settings किंवा Manual मोड सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल. कधीकधी नेटवर्क मॅन्युअर मोडवर किंवा काही वेळा ऑटोमोडचा वापर करून हे नेटवर्क सेट करू शकता. त्यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते. 

सिग्नल बूस्टर
सिग्नल बूस्टरचा वापर करून तुम्ही नेटवर्क आपल्या फोनमध्ये अधिक चांगलं करू शकता.