Google Maps तुम्हाला अपघात आणि चलान कापण्यापासून वाचवणार, कसं ते जाणून घ्या

शिवाय यामुळे लोकांची भटकंतीही वाचते आणि वेळ वाया जात नाही. 

Updated: Feb 28, 2022, 05:09 PM IST
Google Maps तुम्हाला अपघात आणि चलान कापण्यापासून वाचवणार, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : सुरूवातीला जर तुम्हाला कुठे जायचं असेल आणि ती जागा नक्की कुठे आहे हे माहित नसायचं, ज्यामुळे त्या जागेवर पोहोचण्यासाठी आपल्याला रस्त्यात कोणालातरी विचारावं लागायचं. परंतु गुगल मॅप आल्यानंतर लोकांचा मोठा प्रॉबलम सॉलव्ह झाला आहे. गुगल मॅप्सच्या मदतीने आपण इच्छीत स्थळी पोहोचतो. गुगल मॅप्स आपल्याला प्रत्येक मार्गाची अचूक माहिती देतो. शिवाय किती अंतर आहे, तेथे पोहोचायला किती वेळ लागेल ही सगळी माहिती आपल्याला सांगतो.

शिवाय यामुळे लोकांची भटकंतीही वाचते आणि वेळ वाया जात नाही. एकूणच, हे एक अतिशय प्रभावी वैशिष्ट्य आहे, जे आता सर्वत्र वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की गुगल मॅपमुळे अपघातही टळतात?

इतकंच नाही तर गुगल मॅप तुम्हाला ट्रॅफिक चालानपासूनही वाचवते, यासाठी तुम्हाला एका टूलचा वापर करावा लागेल. या वैशिष्ट्याबद्दल फारशा लोकांना माहिती नाही, म्हणून आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती देणार आहोत, ज्यामुळे सोप्या स्टेप्सचे पालन करत तुम्हाला हे हे टूल सक्रिय करण्यासाठी मदत करेल.

तुमचा स्वतःचा वेग नियंत्रित करा

Google Maps च्या या टूलचे नाव आहे स्पीड लिमिट वॉर्निंग. यामध्ये गुगल मॅप तुमच्या वाहनाचा वेग जाणून घेतो आणि तुमचा वेग वाढताच तुम्हाला अलर्ट करतो. वेगात असलेल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने बहुतांश अपघात होतात. अशा परिस्थितीत मर्यादित वेगाने गाडी चालवली तर अपघाताची शक्यता खूपच कमी होते. तसेच वाहतूक पोलीस अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तुमचे चलन कापणार नाही.

Google Maps देखील स्पीड लिमिट अलर्टसह या चालानपासून तुमचे संरक्षण करते. आपण वेगाबद्दल सतर्क रहा, ज्यामुळे तुमची कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही.

याप्रमाणे स्पीड लिमिट टूल सक्रिय करा
तुमच्या मोबाईलवर स्पीड लिमिट टूल वापरण्यासाठी, तुम्हाला Google Maps अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्ही Google Maps वर जाऊन ते अपडेट करू शकता. आता या स्टेप्स फॉलो करा.

1. Google Maps उघडा आणि उजवीकडील प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.

2. यानंतर, सेटिंग्ज पर्यायावर जाऊन, नेव्हिगेशन सेटिंग्जवर टॅप करा.

3. आता वेग मर्यादा सेटिंगसह पर्याय निवडा.

4. त्यानंतर स्क्रीनच्या तळाशी जा आणि खाली स्क्रोल करा आणि ड्रायव्हिंग पर्याय निवडा.

5. शेवटी स्पीड लिमिट आणि स्पीडोमीटर पर्याय चालू करा.

6. हे केल्यावर, Google Maps चे हे टूल तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालू होईल आणि तुम्हाला वेग मर्यादेची माहिती तुम्हाला मिळू लागेल.