Smartphone Tips: पावसात मोबाईल भिजला तरी 'नो टेन्शन'! या बाबी फॉलो करा आणि फोन सुरक्षित ठेवा

फोन सुरक्षित राहावा कव्हर घालण्यापासून स्क्रिनगार्ड लावलं जातं. पण कधी कधी इतकं करूनही मुसळधार पावसात मोबाईल भिजतो आणि खराब होईल अशी भीती वाटते. 

Updated: Aug 7, 2022, 04:31 PM IST
Smartphone Tips: पावसात मोबाईल भिजला तरी 'नो टेन्शन'! या बाबी फॉलो करा आणि फोन सुरक्षित ठेवा title=

Smartphone Care Tips: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोन अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीपासून उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक काम चुटकीसरसी पूर्ण होतात. त्यामुळे अनेक जण तळहाताच्या फोडाप्रमाणे स्मार्टफोन जपतात. फोन सुरक्षित राहावा कव्हर घालण्यापासून स्क्रिनगार्ड लावलं जातं. पण कधी कधी इतकं करूनही मुसळधार पावसात मोबाईल भिजतो आणि खराब होईल अशी भीती वाटते. कारण पाणी मोबाईलच्या आतील पार्टला लागलं तर नुकसान झालंच समजा. त्यात रिपेअर झाला तर बरा अन्यथा फोन थेट कचऱ्याच्या डब्ब्यातच टाकावा लागेल. जर भर पावसात बाहेर जात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे  पाण्यात भिजल्यानंतरही तुमचा स्मार्टफोन व्यवस्थित राहू शकतो. 

स्मार्टफोन तांदळात ठेवा

तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल तर काळजी करू नका. घरी पोहोचल्या पोहोचल्या तांदळाचा डब्बा घ्या आणि फोन त्यात ठेवा. कदाचित तुम्हाला हा प्रकार विचित्र वाटेल. पण तांदूळ वेगाने पाणी शोषून घेते हे तितकंच खरं आहे. या दरम्यान तुम्ही स्मार्टफोन सुरू करण्याची घाई करू नका. स्मार्टफोन एका दिवसानंतर डब्ब्यातून बाहेर काढा आणि मग सुरु करा. काही जणांना या पद्धतीचा चांगला अनुभव आला आहे. त्यामुळे ही पद्धत अनेक जण अवलंबतात.

स्मार्टफोन वाइप वापरा

जर तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल तर टेन्शन घेऊ नका. घरी आल्यानंतर वाइपने पुसून काढा. वास्तविक वाइप पाण्याचे लहान थेंब शोषून घेते.  तुमचा स्मार्टफोन पाण्याच्या संपर्कात आल्यास खराब होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही वाइप वापरू शकता. ही पद्धत खूप उपयुक्त आहे, परंतु फोनमध्ये थोडं पाणी असतानाच ही पद्धत वापरावी, अन्यथा फोन खराब होऊ शकतो.