Royal Enfield Hunter 350 launch: बुलेट म्हटलं कि एक रॉयल बाईक जी सर्वाना खूप आवडते बुलेटचा एक वेगळाच स्वॅग आहे. तरुणाई तर बुलेटवर विशेष फिदा आहे;पण बुलेट घेणं सर्वानाच जमतं असं नाही .बुलेटची किंमत खूप असते त्यामुळे बजेट कमी असणारे बुलेट घ्यायची इच्छा असूनही ती घेऊ शकत नाहीत पण आता तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Royal Enfield आज भारतात आणखी एक धमाका करणार आहे. कंपनी आपली नवीन बाईक हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) लाँच करणार आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असू शकते असे बोललं जातयं.या बाइकला नवीन क्लासिक 350 आणि Meteor 350 प्रमाणेच इंजिन आणि प्लॅटफॉर्म मिळेल.तसेच, याला निओ-रेट्रो टूरर आणि स्क्रॅम्बलर बाइकचा लूक दिला जाईल.
बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन सारखे फीचर्स दिली जाऊ शकतात. यात 17 इंची अलॉय व्हील्स आहेत. दोन्ही टायर ट्यूबलेस आहेत आणि दोघांनाही डिस्क ब्रेक दिला गेला आहे . बाइकच्या डिझाइननुसार, हंटर 350 दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाऊ शकते: Royal Enfield Hunter 350 Metro आणि Royal Enfield Hunter 350 Retro.
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 एक अॅडव्हन्स 349cc, सिंगल-सिलेंडर, दोन-व्हॉल्व्ह, SOHC, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे. इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. हे 6,100 rpm वर 20.2 Bhp आणि 4,000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
हंटर 350 ला कंपनीच्या बाकीच्या बाइक्सपेक्षा वेगळा लूक देण्यात आला आहे. हे टूरिंगपेक्षा स्पोर्टियर जास्त दिसते म्हणजे थोडा स्पोर्ट लुक टच देण्यात आला आहे . याला गोल हेडलॅम्प, इंडिकेटर आणि एक लांब सिंगल-पीस सीट मिळते, जे याला विंटेज लुक देते. कंपनीच्या आधीच्या मोटरसायकलपेक्षा ही बाईक दिसायला लहान असणार आहे यात पेट्रोलच्या टाकीचं डिझाईन देखील इतर डिजाइन्सपेक्षा वेगळं असणार आहे
पाहूया काय आहे किंमत
सध्या Royal Enfield Bullet 350 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे. त्याची किंमत 1.47 लाख रुपये आले असं सांगण्यात आलं आहे. आणि नवीन Royal Enfield Bullet 350 ची किंमत जवळपास 1.7 लाख रुपये असू शकते.
त्यामुळे बुलेट घ्यायचेय आणि बजेट कमी आहे पण या बजेटशी मिळतं जुळतं बजेट असेल तर हे नवीन बुलेट घ्यायचा विचार नक्की करा.
A new geometry. A new look. A new era. #24hourstogo #AShotOfMotorcyclinghttps://t.co/YtRdgplOsK
#RoyalEnfield #RidePure #PureMotorcycling pic.twitter.com/NYK9tbruuW
— Royal Enfield (@royalenfield) August 6, 2022