पेटीएमवर प्रत्येक खरेदीवर मिळत आहे सरप्राईज गिफ्ट !

पेटीएमवर सध्या चालू असलेल्या 'मेरा कॅशबॅक सेल' मध्ये प्रत्येक खरेदीवर एक सरप्राईज गिफ्ट मिळत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 22, 2017, 02:17 PM IST
पेटीएमवर प्रत्येक खरेदीवर मिळत आहे सरप्राईज गिफ्ट ! title=

नवी दिल्ली : पेटीएमवर सध्या चालू असलेल्या 'मेरा कॅशबॅक सेल' मध्ये प्रत्येक खरेदीवर एक सरप्राईज गिफ्ट मिळत आहे. ही ऑफर २०-२३ सप्टेंबरपर्यंतच आहे. ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक आनंददायी करण्यासाठी पेटीएमने लकी लिफाफा ही संकल्पना सुरु केली आहे. ज्यामध्ये ग्राहकाला प्रत्येक ऑर्डरनंतर एक सरप्राईज गिफ्ट मिळेल. लकी लिफाफा ऑफरची मूळ किंमत २०० करोड रुपयांपेक्षा अधिक आहे.  

पेटीएमचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अमित सिन्हा यांनी सांगितले की, "या सणासुदीच्या प्रसंगी आमच्या ग्राहकांना कॅशबॅक व्यक्तिरिक्त इतर नवीन सुविधा देण्यासाठी आम्ही हा नवीन आणि अभिनव उपक्रम सुरु करत आहोत आणि त्याबद्दल मी अतिशय उत्साही आहे. या उपक्रमातून आम्ही ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरनंतर खास आणि आकर्षक गिफ्ट्स देणार आहोत."

मेरा कॅशबॅक सेल मध्ये अॅप्पल, सॅमसंग, एलजी, ओपो, विवो, सोनी, एचपी, लेनोव्हा, जेबीएल, फिलिप्स, लिव्हाइस, वूडलँड, कॅटवॉक यांसारख्या अनेक ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. या उपक्रमामुळे स्मार्टफोन्सवर १५,००० रुपयांचं कॅशबॅक, लॅपटॉप आणि घड्याळ्यांवर २०,००० रुपये तर टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन यांसारख्या उपकरणांवर २०% कॅशबॅक मिळत आहे. 

सण उत्सवाच्या या काळात सुमारे सगळ्या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांनी सेल चालू केले आहेत आणि ग्राहकांना आकर्षक ऑफर देत आहेत. ई-कॉमर्सची सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टने २० सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस 'बिग बिलियन डेज' ला सुरुवात केली आहे.