Maruti Suzuki Recall: मारुति सुझुकी देशातील सर्वात मोठी ऑटो उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र कंपनीवर विक्री केलेल्या 9 हजारून अधिक गाड्या परत मागवण्याची वेळ आली आहे. माहितीनुसार मारुति सुझुकीने (Maruti Suzuki) 9125 गाड्या परत मागवल्या आहेत. यामध्ये Ciaz, Ertiga सह पाच मॉडेल्सचा समावेश आहे. या गाड्या 2 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान तयार केल्या असून सीट बेल्टच्या तक्रारीमुळे परत मागवल्या आहेत. गाड्यांच्या फ्रंट रो सीट बेल्टमध्ये ही समस्या जाणवत आहे. कंपनीच्या मते, 'पुढच्या रोमध्ये असलेल्या सीट बेल्टच्या शोल्डर हाइट अॅडजस्टमेंटमध्ये तक्रार येत आहे. ऐन अपघातावेळी सील्ट बेल्ट निघण्याची शक्यता आहे. या तपासणीसाठी गाड्या परत मागवल्या आहे. खराब असलेला पार्ट मोफत बदलला जाणार आहे. कंपनीकडून मालकांना सूचवलं जात आहे.'
कंपनीने परत मागवलेल्या गाड्यांमध्ये सियाज, ब्रेजा, एर्टिगा, एक्सएल6 आणि ग्रँड विटाराचा समावेश आहे. मारुति सुझुकी इंडियाने सांगितलं आहे की, "सियाज, ब्रेजा, एर्टिगा, एक्सएल6 आणि ग्रँड विटाराच्या एकूण 9125 युनिट्स परत मागवले आहेत. या गाड्यांच्या फ्रंट रो सीट बेल्टबाबत तक्रारी आल्या आहेत. या गाड्यांची निर्मिती 2 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान केली होती."
बातमी वाचा- Tyre Tips: गाडीच्या टायरची अशी घ्याल काळजी, या स्टेप्स फॉलो कराल
मारुति सुझुकीने जानेवारीपासून आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या महिन्यात मारुतिच्या गाड्यांना 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिलं जात आहे. डिस्काउंटचा लाभ 31 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे.