मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 11, 2018, 02:34 PM IST
मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ

अर्थसंकल्पापूर्वी मारुती कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे मारुती कंपनीच्या कार १७ हजार रुपयांपर्यंत महागल्या आहेत. नव्या किंमती लागूही करण्यात आल्या आहेत. 

१७०० रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत वाढवल्या किंमती

मारुती कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर १७०० रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. अॅडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, रॉ मटेरियल आणि वितरण खर्चात वाढ झाल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 

यापूर्वीच दिली होती कल्पना

मारुती कंपनीने गेल्या महिन्यात इयर इंड सेल दरम्यान ग्राहकांना कल्पना दिली होती की, नव्या वर्षात कारच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

होंडानेही वाढवल्या किंमती

होंडा कार्सने आठ जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. वेगवेगळ्या मॉडल्सवर ६००० रुपयांपासून ३२००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फोर्ड इंडियानेही आपल्या कारच्या किंमतीत ४% नी वाढ केली आहे. 

टाटा मोटर्सनेही वाढवल्या किंमती

मारुती कंपनीच्या आधी टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. टाटा मोटर्सने १ जानेवारीपासून २५ हजार रुपयांपर्यंत आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. यासोबतच ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, रेनॉने ही या महिन्यात आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे.