मुंबई : बजाज ऑटोने आपल्या दोन नव्या डिस्कवर रेंजच्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. बजाज डिस्कवर १२५ बाईकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत तर डिस्कवर ११० सीसी मॉडलही लॉन्च करण्यात आलं आहे.
या दोन्ही बाईक ब्लॅक, ब्लू आणि रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल. भारतीय बाजारात या बाईकची स्पर्धा टीव्हीएस विक्टर, होंडा ड्रीम सीरिज आणि हिरो पॅशन प्रो इत्यादी बाईक्ससोबत होणार आहे.
बजाज डिस्कवरने नवीन ११० सीसी मॉडल लॉन्च केलंय, तर डिस्कवर १२५ बाईकला एलईडी DRLs, नवीन ग्राफिक्स आणि काही कॉस्मेटीक बदलांसह अपग्रेड करून लॉन्च करण्यात आलं आहे. डिस्कवरचं नवीन ११० मॉडेल क्रॅडेल फ्रेमच्या ऎवजी बजाज डायमंड सिंगल डाऊनट्यूब फ्रेमवर तयार करण्यात आलंय. यात नवीन डेकल्स लावण्यात आले आहे. ब्लॅक अलॉय व्हिल्स, इंजिन आणि फ्रन्ट फोर्क्स असलेल्या या बाईकचे टायर डिस्क ब्रेक नाहीयेत.
बाईकच्या इंजिन आणि स्पेसिफिकेशनबाबत सांगायचं तर नव्या डिस्कवर ११० बाईकमध्ये ११५ सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन, एअर कूल्ड इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन ८.५ बीएचपी पावर सोबत ९.८ एनएमचा टार्क जनरेट करतं. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससोबत असेल.
बजाज डिस्कवर १२५ या बाईकमध्ये १२४ सीसीचं इजिंन देण्यात आलंय. हे इंजिन ११ बीएचपीसोबत ११ एनएमचं टार्क जनरेट करतं. डिस्कवर ११० ची किंमत ५० हजार १७६ रूपये आहे, तर डिस्कवर १२५ बाईकची किंमत ५३ हजार १७१ रूपये आहे. आणि डिस्कवर १२५ (डिस्क ब्रेक व्हेरिएंट)ची किंमत ५५ हजार ९९४ रूपये आहे.