Phone Lost or Stolen: फोन चोरीला गेला अथवा हरवल्यास तातडीने करा या 5 गोष्टी

Phone Lost: फोन हरवणं किंवा चोरीला जाणं ही गोष्ट आपल्याबरोबर किंवा आपल्या ओळखीतल्या लोकांबरोबर नक्कीच घडला असणार. मात्र अशाप्रकारे फोन गायब झाल्यानंतर नेमकं काय करावं हे अनेकांना कळत नाही. त्यामुळेच फोन चोरीला गेल्यास तो कसा शोधता येईल किंवा काय करावं यासंदर्भातील पाच टीप्स जाणून घेऊयात...

Updated: Jan 28, 2023, 04:51 PM IST
Phone Lost or Stolen: फोन चोरीला गेला अथवा हरवल्यास तातडीने करा या 5 गोष्टी title=
Phone Lost or Stolen

Phone Lost or Stolen: फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्याची घटना आपल्याबरोबर किंवा आपल्या निकटवर्तीयांबरोबर नक्कीच घडली असेल. एखाद्या व्यक्तीचा फोन हरवतो किंवा चोरीला जातो तेव्हा गोंधळ उडणे सामान्य बाब आहे. मात्र फोनमधील डेटा सुरक्षित करण्यासाठी काही गोष्टी तातडीने करणं आवश्यक असतं. यासाठी आपण या लेखामधून अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या गोष्टींकडे लोक फोन हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या धक्क्यामुळे दुर्लक्ष करतात...

1- फोन लॉक (Phone Lock) : अ‍ॅण्ड्रॉइड किंवा आयओएस युझर्सला अनेकदा आपल्या फोनचा पॅटर्न, फेस-रिकग्नायझेशन लॉक, फिंगरप्रिंट, वॉइस-रिकग्नायझेशन लॉक, पासवर्ड लॉक करुन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्ही तुमचा आयफोन तुमच्याकडे नसतानाही तो लॉक करु शकता. या माध्यमातून कोणीही तुमच्या खासगी माहितीपर्यंत पोहचणार नाही. तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये कोणत्याही इतर डिव्हाइसमधून लॉगइन करुन आपल्या अ‍ॅपल अकाऊंटवरुन लॉगइन करुन फाइंड माय आयफोन पर्यायावर क्लिक करुन लॉस्ट मोड अ‍ॅक्टीव्ह करु शकता.

2 - जीपीएसच्या माध्यमातून फोन ट्रॅक करा (GPS Phone Tracking): तुम्हाला कॉल करुनही फोन मिळाला नाही तर फोनच्या जीपीएसचा वापर करुन तुम्ही फोन कुठे आहे याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करु शकता. मात्र तुमच्या फोनमधील जीपीएस सक्रीय नसेल म्हणजेच ऑन नसेल तर हा पर्याय तुम्हाला फोन शोधण्यासाठी वापरता येणार नाही. तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइसमध्ये एक इनबिल्ड लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस असते जी तुमच्या मोबाईलवरुन होणाऱ्या प्रत्येक अ‍ॅक्टीव्हीटीवर लक्ष ठेवते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एखाध्या अन्य डिव्हाइसमधून तुमच्या गुगल अकाऊंटवर लॉगइन करु शकता आणि तुमचा हरवलेला फोन कुठे आहे याची लोकेशन जाणून घेऊ शकता. फोनची लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही गुगल लोकेशन हिस्ट्री पर्याय निवडून माहिती मिळवू शकतात.

3. घरातूनच हरवलेल्या फोनमधील डेटा करा डिलीट (Data Delete): तुमच्या फोनचा शोध घेण्यासाठी कॉल करणं किंवा जीपीएसचा वापर करणं हा पर्याय उपलब्ध नसेल तर ज्या व्यक्तीने फोन चोरला आहे किंवा ज्याला फोन सापडला आहे त्याने फोनची बॅटरी आणि सिम कार्डही काढलं असण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या iCloud किंवा Google खात्यावरुन आपला संपूर्ण डेटा डिलीट करु शकता. मात्र यामुळे तुम्ही तुमचं डिव्हाइस पुन्हा ट्रॅक करु शकणार नाही. मात्र या फोनमधील डेटा तुम्ही बॅकअप करुन ठेवला असेल तर तो तुम्ही फोनवरुन डिलीट करुन पुन्हा रिस्टोअर करु शकता.

4. रिपोर्ट करा (Report)- जर तुमचा फोन हरवलेला नाही आणि चोरीला गेलाय असं तुम्हाला वाटत असेल तर यासंदर्भातील माहिती सर्वात आधी पोलिसांना द्या. मात्र अशा माध्यमातून फोन मिळण्याची शक्यात कमी असली तरी चोरीचा फोन दुसऱ्या कारणांसाठी वापरला गेला तरी तो चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे असल्याने पुढीच अडचणी वाढणार नाहीत. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास विम्याची रक्कम क्लेम करताना रेफ्रन्स क्रमांक म्हणून या तक्रारीचा क्रमांक लागतो. मात्र यासाठी तुमचा फोन नक्की चोरीला गेला असून पडला नाही हे निश्चित करावं लागणार.

5. सिम डिअ‍ॅक्टीव्हेशन (SIM Deactivation)- तुमच्या फोनवर कोणताही कॉल करता येत नसल्याची तुम्हाला खात्री झाल्यानंतर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करुन आपलं सिम कार्ड डिअ‍ॅक्टीव्हेट करु शकता. अर्थात यामुळे तुमचा फोन यामुळे मिळणार नाही. मात्र तुमचा क्रमांक चुकीच्या कामासाठी वापरला जणार नाही.