Viral News : 2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार? मानवाचा मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होणार

स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.

Updated: Jan 28, 2023, 04:04 PM IST
Viral News : 2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार? मानवाचा मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होणार title=

Smartphones Will Be Extinct By 2030 : अन्न, वस्त्र,  निवारा या तीन मानवाच्या मुलभूत गरजा आहे. मात्र, या व्यतीरीक्त मोबाईल फोन देखील आता मनुष्याच्या आयुष्यातील अत्यंत गरजेची वस्तु बनली आहे. संपर्काच माध्यम असलेल्या स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. यामुळे आता मोबाईलशिवाय राहण्याची कल्पना करणे म्हणजे तस अशक्य ठरु शकत. याच मोबाईल क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल होत आहे.  मात्र,  2030 पर्यंत स्मार्टफोनच नामशेष होतील आणि मानवाचा मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होईल. हे काल्पनिक वाटत आहे. पण असं प्रत्यक्षात घडणार असल्याचा दावा नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क (Nokia CEO Pekka Lundmark) यांनी केला आहे. 

स्मार्टफोनही सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्या वस्तु बनली आहे. संपर्काचे माध्यम असेलल्या स्मार्टफोनने आता याच्या पलीकडे आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळे आता स्मार्टफोनशिवाय( smartphone) राहणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. त्यातच आता स्मार्टफोन नामशेष होणार असल्याचा दावा केला जात आहे. 2030 पर्यंत 6G चा व्यावसायिक वापर सुरू होईल. माबोईलशी संबधीत अनेक उपकरणे थेट मानवाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जातील असा दावा लुंडमार्क यांनी केला आहे. 

सध्याच्या नेटवर्कपेक्षा 6G चा स्पीड सुमारे 100 पट किंवा 1,000 पट वेगवान असेल. 6G नेटवर्कच्या तांत्रिक गरजे प्रमाणे मोबाईल फोन बनवले जातील. यामुळे एका चीपच्या माध्यमातून मानवाचा मेंदू इंटरनेटसोबत कनेक्ट केला जाईल. इलॉन मस्क यांची कंपनी न्यूरालिंक ही सध्या मानवाच्या मेंदूत चिप बसवण्याचे तंत्रज्ञात विकसीत करत आहे. यामुळे मोबाईलच्या इंटरफेसची गरज पडणार नाही.  स्मार्ट चश्मा मोबाईलचे काम करेल. मेंदू थेट इंटरनेटशी जोडला जाईल आणि  स्मार्ट चश्म्याच्या माध्यमातून कमांड दिले जातील असा दावा पेक्का लुंडमार्क यांनी केला. 

स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील - बिल गेट्स यांचा शॉकिंग दावा

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स(Bill Gates) यांनी देखील पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होतील असा दावा केला आहे. स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील असे बिल गेट्स यांनी आपल्या दाव्यात म्हंटले आहे. स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप असून दिसायला टॅटूसारखी असणार आहे.  ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येईल. 

स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे. ज्यांच्या  शरीरावर हा इलेक्ट्रॉनिक टॅटू अर्थात चिप असले अशा कोणत्याही व्यक्तीला हातात स्मार्टफोन घेण्याची गरजच पडणार नाही असे बिल गेट्स यांचे म्हणणे आहे.बिल गेट्स यांचा हा दावा खरा ठरल्यास मोबाईल हातात घेऊन फिरावे लागणार नाही.