मुंबई : टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ एकामागे एक अनेक यश मिळवत चालली आहे. वोडाफोनला मागे टाकत रिलायंस जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. रिलायंस जिओ इंफोकॉम रेवेन्यू मार्केट शेअरच्या बाबतीत आता देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
यासोबतच जिओने भारती एअरटेल आणि त्यांच्यामधील अंतर देखील कमी केलं आहे. ग्रामीण भागात जिओला मोठं यश मिळालं आहे. आपल्या स्वस्त ऑफरमुळे जिओचं ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
4जी सर्विस लॉन्च केल्यानंतर मागील 2 वर्षामध्ये रिलायंस जिओचा रेवेन्यू मार्केट शेअर जून 2018 च्या तिमाहीमध्ये 22.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्चच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा रेवेन्यू मार्केट शेअर 2.53 टक्क्यांनी वाढला आहे. ही माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने दिली आहे.