4G इंटरनेट स्पीडमध्ये हे नेटवर्क अव्वल

4G इंटरनेट स्पीडबाबतची सप्टेंबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.

Updated: Dec 5, 2017, 08:23 PM IST
4G इंटरनेट स्पीडमध्ये हे नेटवर्क अव्वल  title=

मुंबई : 4G इंटरनेट स्पीडबाबतची सप्टेंबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. दूरसंचार नियामक ट्रायनं त्यांच्या वेबसाईटवर ही आकडेवारी दिली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये रिलायन्स जिओचा स्पीड सर्वात जास्त होता. सप्टेंबरमध्ये जिओचा डाऊनलोड स्पीड २१.९ एमबीपीएस एवढा होता. तर 3G मध्ये व्होडाफोनचा स्पीड सर्वाधिक म्हणजेच २.९ एमबीपीएस एवढा होता.

रिलायन्स जिओ स्पीडच्या बाबतीत लागोपाठ ९ महिने पहिल्या क्रमांकावर आहे. ऑगस्टमध्ये जिओचा डाऊनलोड स्पीड १८.४ एमबीपीएस होता. सप्टेंबर महिन्यामध्ये 4G स्पीडमध्ये व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर होतं. व्होडाफोनचा डाऊनलोड स्पीड ८.७ एमबीपीएस होता. तर आयडिया नेटवर्कला ८.६ आणि एअरटेलला ७.५ एमबीपीएसचा स्पीड मिळाला.

3G नेटवर्कमध्ये व्होडाफोनचा डाऊनलोड स्पीड सर्वाधिक २.९ एमबीपीएस, आयडियाचा स्पीड २.५ एमबीपीएस आणि एअरटेलचा स्पीड २.३ एमबीपीएस एवढा होता.