जिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Oct 27, 2017, 02:02 PM IST
जिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत  title=

मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता. 

मात्र आता जिओने हा प्लान काही बदलांसाठी पुन्हा आणलाय. आता ३०९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी दररोज १ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देतेय. या प्लानमध्ये अनलिमिटेड मेसेजिंगचीही सुविधा आहे. मात्र प्लानची व्हॅलिडिटी ४९ दिवसांची आहे. या आधी याची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची होती. दिवसाचा तुमचा १ जीबी डेटा संपल्यास त्यानंतरही इंटरनेट सुरु राहील मात्र त्याचा स्पीड ६४ केबीपीएस इतका असेल.

याशिवा कंपनीने काही दिवसांपूर्वीच नवे प्लान जाहीर केले. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ३५० जीबी हायस्पीड डेटा दिला जाणार आहे. या प्लानची व्हॅलिडिटी ३६० दिवस असेल. 

जर तुमचा इंटरनेट डेटा ३६० दिवसांच्या आत संपला तर मोबाईलवर सर्फिंग बंद होणार नाही आणि यावर अनलिमिटेड इंटरनेट सुरु राहील. मात्र याचा स्पीड ६४ केबीपीएस इतका राहील. याशिवाय या प्लानमद्ये अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड मेसेजिंगचीही सुविधा आहे. या प्लानमध्ये जिओचे सर्व अॅप तुम्ही ३६० दिवस वापरु शकता.