मुंबई : देशात बुलेट ट्रेनची चर्चा होत असताना, जपानने १९६४ साली पहिली बुलेट ट्रेन आणली होती, तेव्हा या बुलेट ट्रेनचा वेग ताशी १५४ किलो मीटर होता. कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं.
१० कोटी प्रवाशांनी या बुलेट ट्रेनने आतापर्यंत सुरक्षित प्रवास केला आहे. जपानची बुलेट ट्रेन पहिल्यांदा चर्चेला आली तेव्हा ती किती वेगाने आणि कशी धावते याबद्दल भारतीयांनाही मोठी उत्सुकता होती.
तिकडे लंडनमध्ये याच वर्षी मोनोरेल सुरू झाली होती. बुलेटट्रेनचा हा मूळ व्हिडीओ ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे, त्याला डिजिटल तंत्रज्ञानाने रंगीत करण्यात आला आहे.