iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

iPhone 15 launching: अॅपलचा आयफोन-15 सीरीज लवकरच लाँच करण्यात येत आहे. त्याआधी चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 5, 2023, 03:35 PM IST
iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा! title=
iPhone 15 launching in 8 days Expected price design

Apple Iphone 15 Series: आयफोनच्या ( Iphone) चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अॅपल कंपनी लवकरच iPhone 15 लाँच करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्हीदेखील आयफोनचे नवीन मॉडेल खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयफोन-15 खरेदी करणाऱ्या युजर्सचा डबल फायदा होणार आहे. कसं ते जाणून घेऊया. (Apple Iphone 15 Series Details)

iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबर 2023 ला लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये आयफोनचे चार मॉडल आईफोन 15, आईफोन 15 Pro, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra आहेत. या वर्षी लाँच होणारा आयफोन अनेक बाबतीत खास आहे. त्यामुळं आयफोनचे खास फिचर काय असतील जाणून घेऊया. 

काय असेल खास

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयफोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात येणार आहे. म्हणजेच युजर्सना वेगळे अॅडॉप्टर घेण्याची गरज लागणार नाही. यामुळं युजर्सचे पैसे देखील वाचणार आहेत. यापूर्वी आयफोन खरेदी करत असताना त्यासोबत अॅडॉप्टर वेगळे घ्यावे लागत होते. त्यासाठी युजर्सना अधिकचे पैसे मोजावे लागत होते. मात्र, असे होणार नाहीये. 

आयफोन-15 चा दुसरा फायदा म्हणजे आता आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. आयफोन-15 लाँच झाल्यानंतर 10 दिवसांतच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे 

आयफोन 15चे मॅन्युफॅक्चरिंग तामिळनाडू येथे होत आहे. भारतातून अमेरिका आणि युरोपमध्ये एक्सपोर्ट करण्यात येणार आहे. मात्र, भारतातील मागणी पूर्ण केल्यानंतर डिसेंबरपर्यंत एक्सपोर्ट करण्याची तयारी सुरू करण्यात येणार आहे. 

मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या अॅपल आयफोन 14 ची डिलिव्हरी उशीराने करण्यात आली होती. आयफोन 14ला तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूरच्या फॉक्सकॉन प्लांटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र लाँच झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर iPhone 14 ची डिल्हीव्हरी करण्यात आली होती. फॉक्सोनने लाँच केल्यानंतर 10 दिवसांत iPhone 15ची मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यात आली होती. 

कधी होणार लाँच

iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबरचा लाँच करण्यात येणार आहे. यावेळी आयफोनच्या इव्हेंटला वंडरलस्ट असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा इव्हेंट सुरू होणार आहे. 

भारतात iPhoneचे सर्व मॉडेल बनवले जात नाहीत. तर, त्याचे स्टँडर्ट व्हेरियंट भारतात बनवले जातात. प्रो आणि प्रो मॅक्स मॉडल चीनमध्ये बनवले जातात.