IPhone 14 'या' तारखेला होणार लॉंच, जाणून घ्या डिटेल्स!

 Iphone 13 लाँच झाल्यानंतर मात्र आता या डिव्हाइसच्या लाँचिंग आधीच iPhone 14 चर्चेत आहे. या वर्षी लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन मालिकेची लॉन्च तारीख (iPhone 14 लाँच तारीख) आणि किंमत (iPhone 14 Price) संदर्भात अनेक अहवाल आले आहेत.

Updated: Aug 19, 2022, 05:00 PM IST
IPhone 14 'या' तारखेला होणार लॉंच, जाणून घ्या डिटेल्स! title=

IPhone 14 : जगातील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड Apple ची सर्व उत्पादने जगभरात तयार केली जातात. Iphone 13 लाँच झाल्यानंतर मात्र आता या डिव्हाइसच्या लाँचिंग आधीच iPhone 14 चर्चेत आहे. या वर्षी लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन मालिकेची लॉन्च तारीख (iPhone 14 लाँच तारीख) आणि किंमत (iPhone 14 Price) संदर्भात अनेक अहवाल आले आहेत.

परंतु अंतिम तारीख उघड झालेली नाही. दरम्यान आता iPhone 14 सिरीजची लॉन्च तारीख समोर आली आहे. अहवालमध्ये असे म्हटले की,  iPhone 14 सप्टेंबरमध्येच लॉन्च केला जाईल अशी माहिती मिळत आहे. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांच्या म्हणण्यानुसार Apple 7 सप्टेंबरला आपल्या iPhone 14 सिरीजच्या लॉन्च इव्हेंटची तयारी करत आहे.

iPhone 14 किंमत किती?

iPhone 14 च्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमतीबद्दल बोलले गेले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 ची किंमत iPhone 13 पेक्षा 10 हजार रुपये जास्त असू शकते. तर अनेक रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 चे बेस मॉडेल iPhone 13 सारखेच असेल. नवीन iPhone 14 Max ची किंमत $899 (जवळपास 68,500 रुपये) पासून सुरू होऊ शकते. आयफोन 14 प्रो मॅक्स या टॉप मॉडेलची किंमत $1,199 (सुमारे 91,400 रुपये) पासून सुरू होईल. तसेच या वर्षी देखील आयफोन 14 मालिकेत चार मॉडेल्स असतील.  यामध्ये  iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार मॉडेल लॉन्च केले जात आहेत.