iPhone 14 च्या 'या' फीचरबाबत माहिती लीक! आयफोनप्रेमींमध्ये उत्सुकता

आयफोनचं नवीन वर्जन म्हटलं की स्मार्टफोनप्रेमींचा जीव की प्राण असतो. आतापर्यंत अ‍ॅपलने आयफोन13 पर्यंत वर्जन लाँच केले आहेत

Updated: Jun 20, 2022, 07:54 PM IST
iPhone 14 च्या 'या' फीचरबाबत माहिती लीक! आयफोनप्रेमींमध्ये उत्सुकता title=

iPhone 14 Leaks and Details: आयफोनचं नवीन वर्जन म्हटलं की स्मार्टफोनप्रेमींचा जीव की प्राण असतो. आतापर्यंत अ‍ॅपलने आयफोन13 पर्यंत वर्जन लाँच केले आहेत. त्यामुळे आता आयफोन 14 चे वेध लागले आहेत. आयफोन 14 हा सप्टेंबर 2022 रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु लीकद्वारे बरेच काही कळले आहे. आयफोन 14 चे चार प्रकार असणार आहेत. iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro यांचा समावेश असं बोललं जात आहे. 

लेटेस्ट लीकमध्ये या स्मार्टफोन सीरिजच्या डिस्प्लेची माहिती समोर आली आहे. Omdia च्या नवीन मार्केट रिसर्च रिपोर्टनुसार, अ‍ॅपल पूर्वीप्रमाणेच, iPhone 14 मॉडेल्सच्या डिस्प्लेसाठी LG, Samsung आणि BOE सोबत भागीदारी करत आहे. आयफोन 14 च्या चारही मॉडेल्समध्ये OLED डिस्प्लेचे दोन प्रकार दिले जातील. रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 आणि iPhone 14 Max मध्ये LTPS OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये iPhone 14 चा डिस्प्ले 6.1-इंचाचा आणि iPhone 14 Max चा डिस्प्ले 6.9-इंचाचा असेल. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट खूप जास्त असणार आहे.

दुसरीकडे, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max LTPO OLED डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकतात. या दोन मॉडेल्समध्ये व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR) फीचर आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर देखील दिले जाऊ शकतात.

आधीच्या रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 आणि iPhone 14 Max मध्ये वाइड-नॉच डिस्प्ले असेल, तर प्रो मॉडेल्स पिल-शेपच्या नॉचसह येऊ शकतात. प्रो मॉडेल्सच्या स्क्रीनचा आकारही इतर दोन मॉडेल्सपेक्षा मोठा असू शकतो.