टीनेजर्ससाठी घातक सोशल मीडियाचा वापर? काय सांगतोय अहवाल

आजकाल फेसबुकपेक्षाही Instagram वापरण्याकडे युवकांचा कल असताना आता एक धक्कादायक अहवाल समोर आलाय...

Updated: Sep 18, 2021, 10:23 PM IST
टीनेजर्ससाठी घातक सोशल मीडियाचा वापर? काय सांगतोय अहवाल title=

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बराचसा वेळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खर्च होतो. युवकांसाठी हा वेळ महत्त्वाचा आहे. मात्र अनेक युवक हा वेळ इन्स्टाग्राम फेसबुक साऱख्या सोशल मीडियावर घालवत असतात. आता अनेक युवक फेसबुकपेक्षाही इन्स्टाग्रामकडे जास्त वळताना दिसत आहेत. इन्स्टा स्टोरी पोस्ट करणं, वेगवेगळे फोटो, व्हि़डीओ अपलोड करण्याकडे हा कल आहे. इन्स्टाग्रामचा अति वापर युवा पिढीसाठी घातक ठरतोय असं एका अहवालातून समोर आलं आहे. हा अहवाल नेमका कोणता आणि काय म्हटलंय त्यामध्ये जाणून घेऊया.

इंटरनेट किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणं युवक आणि मुलांसाठी योग्य नाही. ही वस्तुस्थिती आता जगातील आघाडीच्या सोशल मीडिया कंपनीने स्वीकारली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये संशोधन केलं. या संशोधनातून आलेल्या अहवालानुसार युवकांसाठी इन्स्टाग्राम धोक्याचं ठरत आहे असं म्हटलं आहे. 

 वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या अहवालानुसार आणि यापूर्वी मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या अहवालानुसार हे समोर आलं आहे की सोशल मीडियाचा वापर युवकांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी हानीकारक आहे. फेसबुकने हा अहवाल जगासमोर येण्यापासून रोखल्याचा आरोपही काही तज्ज्ञांनी केला आहे. 

ऑफसमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू कऱण्यात आलं. त्याच सोबत कोरोनाचा संसर्ग मुलांना होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू झालं. त्यामुळे मुलं ऑनलाइन शिक्षणासोबत फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम सारख्या मध्यमांकडेही आपसूकच वळली. या सगळ्या परिस्थितीचा त्यांचा मनावर कुठेतरी खोलवर परिणाम होत असल्याचं या अहवालातून मांडण्यात आलं आहे. 

अहवालानुसार, किशोरवयीन मुले जास्तवेळ ऑनलाइन राहतात. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, 89% मुले सतत किंवा दिवसातून अनेक वेळा ऑनलाइन असतात. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा अॅप म्हणजे इंस्टाग्राम. किशोरवयीन किंवा 10 ते 19 वयोगटातील मुले, जेव्हा या अॅपचा वापर सर्वात जास्त करतात. या सगळ्याचा त्यांच्या वर्तनावर, मूडवर आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. 

सोशल मीडियामुळे या मुलांची एकाग्रता भंग होते. त्यांच्या मानसिक विकासावरही खोल परिणाम होतो. किशोरवयीन मुलं सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमध्ये जे आहे त्याची तुलना वस्तूशी स्वत:शी करतात. त्याचा खोलवर परिणाम होत असतो. तज्ज्ञांच्या मते, पौगंडावस्थेमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांबाबत असंतोषामुळे मुलांमध्ये मानसिक विकार देखील उद्भवू शकतात.

जरी फेसबुकने अद्याप ते पूर्णपणे स्वीकारलेले नाही. अशा परिस्थितीत, पालक चित्र किंवा प्रतिमांमध्ये फरक करून आणि प्रत्येक विषयावर त्यांच्या मुलांशी बोलून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापराबद्दल मुलांना माहिती देऊ शकतात. त्याच वेळी, ते त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कसे वापरावे आणि त्यांच्यासाठी किती योग्य आहे हे देखील समजावून सांगू शकतात. फेसबुकवर फिरणारे जोक्स, मेसेज किंवा फोटोचे अर्थ मुलांना नीट समजून सांगणं गरजेचं आहे. याशिवाय मुलं काय बघतात काय करतात याच्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.