Google Play Store आणि Apple Store ला स्वदेशी एप स्टोरची टक्कर

गुगल (Google) आणि एप्पल (Apple) सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं पाऊल 

Updated: Mar 19, 2021, 02:33 PM IST
Google Play Store आणि Apple Store ला स्वदेशी एप स्टोरची टक्कर  title=

मुंबई : गुगल (Google) आणि एप्पल (Apple) सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत सरकारने पाऊल ऊचललंय. मोदी सरकार (Modi Govt.)ने एप डाऊनलोड करण्यासाठी Google Play Store आणि Apple Store च्या स्पर्धेत स्वदेशी एप स्टोर लॉंच केलंय. 

Telecomtalk ने दिलेल्या वृत्तानुसार भारत सरकारने देसी एप स्टोर(Indian App Store) लॉन्च केलंय. Mobile Seva AppStore आता वापरचा येऊ शकते. 

हे ही वाचा : BSNL चा धमाका ! आणलाय सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान

केंद्रीय IT मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच राज्यसभेत यासंदर्भातील माहिती दिली. Google Play Store और Apple Store ला पर्याय म्हणून Mobile Seva AppStore लॉंच करण्यात आलंय.

देशात सद्यस्थितीत असलेल्या डेव्हलपर्सना आवाहन करण्यात आलंय की, ते Mobile Seva AppStore साठी एप तयार करु शकतात. हे एप स्टोर सरकारच्या देखरेख आणि देखभाली अंतर्गत असणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांचे एप Mobile Seva AppStore मधून डाऊनलोड करु शकता. अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार  Mobile Seva AppStore मध्ये राज्य आणि कॅटेगरीच्या हिशोबाने एप्स उपलब्ध असतील. इथे असणारे सर्व एप्स मोफत असणार आहेत.