मोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक

Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.  

Updated: Apr 6, 2022, 02:34 PM IST
मोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक title=

मुंबई : Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये चार पाकिस्तानची चॅनेल्स आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयटी नियम, 2021 च्या अधिसूचनेनंतर प्रथमच भारताकडून YouTube वर प्रसारित करणाऱ्या बातम्या प्रकाशकांवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाने अधिकृतपणे सांगितले की सोमवारी 22 YouTube चॅनेल, तीन ट्विटर खाती, एक फेसबुक खाते आणि एक न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला.

या कारवाईसह, मंत्रालयाने डिसेंबर 2021 पासून, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि भारताची अखंडता, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणास्तव 78 YouTube फेक न्यूज चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या YouTube चॅनेलची 260 कोटींहून अधिक प्रेक्षकसंख्या होती. मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही चॅनेल्स राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवत होते.

ब्लॉक करण्यात आलेल्यांमध्ये 18 भारतीय आणि चार 4 पाकिस्तान-आधारित यूट्यूब चॅनेल्सचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांची नावे उघड केलेली नाही. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक YouTube चॅनेलचा वापर “भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवरील खोट्या बातम्या देत होती. खोट्या पोस्ट करण्यासाठी त्याचा वापर केला गेला. त्यामुळे अशी चॅनेल्स ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानकडून चालविण्यात येणाऱ्या सोशल मीडिया खात्याचा समावेश आहे. यावर भारताविरोधात पोस्ट करण्यात आली होती.

दरम्यान, युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित भारतीय YouTube चॅनेलद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी सामग्री प्रकाशित केली गेली होती आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याचा उद्देश होता, असे केंद्र सरकारकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ब्लॉक केलेले भारतीय यूट्यूब चॅनेल काही टीव्ही न्यूज चॅनेलचे टेम्प्लेट आणि लोगो वापरत आहेत, ज्यात त्यांच्या न्यूज अँकरच्या प्रतिमांचा समावेश आहे. जेणेकरून प्रेक्षकांची दिशाभूल व्हावी जेणेकरून बातम्यातून संभ्रण निर्माण व्हावा. 

तसेच खोट्या लघुप्रतिमांचा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियावर खोटे वृत्त व्हायरल वाढवण्यासाठी व्हिडिओचे शीर्षक आणि लघुप्रतिमा वारंवार बदलण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये, हे देखील निदर्शनास आले की, पद्धतशीरपणे भारतविरोधी बनावट बातम्या पाकिस्तानमधून दिल्या जात आहेत. भारत सरकार एक प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.