जिओ यूजर्ससाठी चांगली बातमी! फक्त 3 रुपये जास्त देऊन मिळवा दुप्पट फायदा

आम्ही तुम्हाला Jio च्या अशा रिचार्जबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ३ रुपये जास्त देऊन दुप्पट फायदा मिळेल.

Updated: Apr 5, 2022, 10:07 PM IST
जिओ यूजर्ससाठी चांगली बातमी! फक्त 3 रुपये जास्त देऊन मिळवा दुप्पट फायदा title=

मुंबई : तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही कमी पैशात चांगल्या रिचार्ज पॅकच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कारण जिओने एक असा नवीन रिजार्ज आणला आहे. जो तुमच्या फायद्याचा आहे. बऱ्याचदा रिचार्ज करायला जाताना आपल्यासमोर असे अनेक पर्याय समोर येतात. ज्याच्या किंमतीत फक्त 3 ते 5 रुपयांपर्यंत फरक असतो. परंतु त्याचे प्लान मात्र वेगवेगळे असतात. अशावेळी ग्राहकांना यामधून योग्य रिचार्ज निवडणे कठीण होते.

तर आज आम्ही तुम्हाला Jio चा असाच एका रिचार्जबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ३ रुपये जास्त देऊन दुप्पट फायदा मिळेल.

जिओचा 296  रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 296 रुपयांचा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. यामध्ये एकूण 25 जीबी डेटा 30 दिवसांसाठी दिला जातो. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या ऍप्सचे सदस्यत्व मिळते.

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा दुसरा प्लॅन 299 रुपयांचा आहे. जो आधीच्या रिचार्जपेक्षा 3 रुपयांनी जास्त आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लानची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण डेटा 56 GB मिळतो. यामध्ये, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस व्यतिरिक्त, तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे सदस्यत्व मिळते.

३ रुपये देऊन दुप्पट नफा

तुम्ही दोन्ही प्लॅनची​तुलना केल्यास, 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 296 रुपयांच्या तुलनेत दुप्पट डेटा मिळतो. पहिल्या प्लॅनमध्ये 25 GB डेटा मिळतो, तर दुसऱ्या प्लानमध्ये 56 GB डेटा मिळतो. जर तुम्हाला दैनिक मर्यादेसह डेटा नको असेल तर 296 रुपयांचा प्लॅन देखील वाईट नाही. यामध्ये तुम्हाला दोन दिवसांची अतिरिक्त वैधता देखील दिली जात आहे.