नवी दिल्ली : तुम्ही स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय बाजारपेठेत एक फिचर फोन लॉन्च झाला असून हा स्वस्तही आहे.
स्वस्त टेरिफ प्लाननंतर आता मोबाईल कंपन्यांमध्ये स्वस्त फोन देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. भारतीय मोबाईल ग्राहकांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज (www.shopclues.com)वर 249 रुपयांत फिचर फोन लॉन्च करण्यात आला आहे.
iKall K71 (आयकॉल के71) हा फिचर फोन अवघ्या 249 रुपयांत ग्राहकांना मिळत आहे. मात्र, या फोनची ही किंमत एका ठराविक काळासाठीच आहे त्यामुळे त्वरा करा आणि संधीचा फायदा घ्या.
iKall K71 (आयकॉल के71) या फिचरफोनमध्ये सिंगल सिमकार्ड असणार आहे. यामध्ये 800 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 1.4 इंचाचा मोनोक्रोम डिस्प्ले आणि एफएण रेडिओ, टॉर्च सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन ४ तासांचा टॉकटाईम देतो आणि याचा स्टँडबाय टाईम २४ तासांचा आहे.
कंपनीने सांगितले की, iKall K71 (आयकॉल के71) हा फोन देशातील टियर 3 आणि टियर 4 शहरांत राहणाऱ्या ग्राहकांना लक्षात ठेवून लॉन्च करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूजवरच वीवाने सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा करत Viva V1 हा फोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत कंपनीने ३४९ रुपये ठेवली होती.
349 रुपयांच्या जवळपास रेंजमधील इतरही काही फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. Viva V1 हा फोन कंपनीने सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा केला होता. मात्र, iKall K71 (आयकॉल के71) हा फोन लॉन्च झाल्यानंतर Viva V1चा रेकॉर्ड तुटत असल्याचं दिसत आहे. शॉपक्लूजवर iKall K71 (आयकॉल के71) या फोनची किंमत 315 रुपये आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला FLAT66 नावाचं कूपन कोड टाकावं लागणार आहे आणि प्रिपेड बूकिंगचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोन 249 रुपयांत मिळणार आहे.
हा फोन सिंगल सिम आणि 2जी नेटवर्कला सपोर्ट करतो. 800mAh बॅटरीची क्षमता असलेल्या या फोनची एका वर्षाची वॉरंटी असणार आहे. हा फोन रेड, यल्लो, ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला 99 रुपयांचा शिपिंग चार्जही द्यावा लागणार आहे.