मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता हुआवेचा सब ब्रान्ड 'ऑनर'नं भारतात आपला बजेट स्मार्टफोन 'ऑनर ९ एन' लॉन्च केलंय. हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आलाय. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत ११,९९९ रुपये तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट किंवा कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून खरेदी केला जाऊ शकेल.
'ऑनर ९ एन'ची विक्री ३१ जुलैपासून सुरू होणार आहे. लॉन्च ऑफरमध्ये रिलायन्स जिओ २,२०० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. सोबतच १०० जीबी अॅडिशनल डाटा मिळेल तसंच १,२०० रुपयांचा मिंत्राचा वाउचरदेखील मिळणार आहे.
हा स्मार्टफोन लेवेंडर पर्पल, सफायर ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि रॉबिन एग ब्लू कलर व्हेरिएन्टसोबत उपलब्ध आहे. परंतु, सध्या हा फोन ब्लू आणि ब्लॅक व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असेल.
'ऑनर ९ एन'मध्ये ५.८४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय. हा स्मार्टफोन 'मेड इन इंडिया' असेल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
या स्मार्टफोनमध्ये हुआवेचं Kirin 659 प्रोसेसर आणि हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आलाय... हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड ८.० ओरिओवर आधारित EMUI वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यात एक सेन्सर १३ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा २ मेगापिक्सलचा... दोन्ही लेसचं अपर्चर f/२.२ आहे. तसंच यामध्ये फेस डिटेक्शन ऑटोफोकसही देण्यात आलाय.
या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh ची बॅटरी देण्यात आलीय. परंतु, यात USB Type C देण्यात आलेला नाही. तुम्हाला स्टॅडर्ड पोर्ट वापरावा लागेल.