इंटरनेट बंद आहे? तरीही वापरता येणार Whatsapp, जाणून घ्या कसं?

जर तुमच्याकडे मोबाईल डाटा नसेल किंवा इंटरनेट नसेल तर तुम्ही WhatsApp वापर करु शकत नाही.

Updated: Jul 30, 2022, 06:52 PM IST
इंटरनेट बंद आहे? तरीही वापरता येणार Whatsapp, जाणून घ्या कसं? title=

WhatsApp Trick: WhatsApp आज कोणाकडे नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या अॅपमुळे आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमैत्रीणी संवाद साधू शकतो. अगदी ऑफिस कामासाठीही या अॅपचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.  WhatsApp असे गोष्टी वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे मोबाईल डाटा नसेल किंवा इंटरनेट नसेल तर तुम्ही WhatsApp वापर करु शकत नाही. मात्र आता WhatsApp यूजर्सला नाराज व्हायची गरज नाही. कारण आता WhatsApp वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची मदत लागणार नाही आहे. आम्ही आज तुम्हाला असं व्‍हॉट्सअॅप ट्रिकबद्दल सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही इंटनेटशिवाय  WhatsApp बिनधास्त वापरु शकता. 

हे कसं शक्य आहे?

तुम्हाला प्रश्न पडला असेल इंटरनेटशिवाय  WhatsApp कसा वापरा येणार. तर तुम्हाला एक सोपी प्रक्रिया करायची आहे. या प्रक्रियासाठी थर्ड-पार्टी अॅपचीसुद्धा गरज नाही. तुमच्याकडे लॅटटॉप असेल त्यावर ही सोपी पद्धत करायची आहे. तुम्हाला यासाठी व्हॉट्सअॅप वेब वापरावं लागेल. 

नेमकं काय करायचं आहे?

मल्टी-डिव्हाइस सपोर्टच्या मदतीने एकदा तुमचा  WhatsApp कनेक्ट केल्यानंतर जर तुमच्याकडे इंटरनेट असेल तरी तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर  WhatsApp वेब वापरू शकतात. यामुळे तुम्ही  WhatsApp वर संदेश पाठवू शकतात आणि तुम्हाला संदेश येऊ पण शकतो.