मुंबई : जर तुम्ही खिशाला परवडण्या किंमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Infinix चा हा नवीन फोन तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. कारण तुम्ही फारच कमी किंमतीत याला आपल्या घरी आणू शकता. जर तुम्हाला हा फोन घेण्यात इट्रेंस्ट असेल, तर याचे फीचर्स नक्की जाणून घ्या. चला या फोनबद्दल माहिती घेऊ. लोकं फोन घेताना सर्वात पहिलं पाहातात ते त्याची किंमत आणि त्याचा कॅमेरा. तर या फोमनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हा फोन 7 हजार 999 रुपयांना मिळेल. तसेच Infinix Smart 6 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8MP प्राथमिक सेन्सर आहे, जो AI डेप्थ सेन्सर आणि ड्युअल LED फ्लॅशसह जोडलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिव्हाइस 5MP फ्रंट-फेसिंग सेन्सरसह देखील येते.
स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला गेला आहे आणि तो MediaTek Helio G25 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये विस्तार करण्यायोग्य रॅम वैशिष्ट्य आहे जे 3GB पर्यंत स्टोरेज वाढविण्यास परवानगी देतो.
Infinix Smart 6 Plus मध्ये 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे, जे microSD कार्ड स्लॉटद्वारे (512GB पर्यंत) वाढवता येते. स्मार्टफोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ आणि एक मायक्रो-USB पोर्ट समाविष्ट आहे
Infinix Smart 6 Plus वरील सेन्सरमध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर, ऍम्बियंट लाइट सेन्सर आणि G-सेन्सरचा समावेश आहे. हँडसेट 5,000mAh बॅटरी पॅक करतो आणि सुरक्षेसाठी समर्पित फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक वैशिष्ट्यासह येतो.
म्हणजेच काय तर कमी पैशात तुम्हाला चांगला स्मार्टफोन मिळत आहे.
आता हा फोन तुम्हाला कुठे मिळेल याबद्दल जाणून घ्या
स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 3 ऑगस्टपासून सुरू होईल आणि क्रिस्टल व्हायलेट, ट्रॅनक्विल सी ब्लू आणि मिरॅकल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असला तरी ज्या ग्राहकांचे बजेट खूपच कमी आहे, त्यांनी तो खरेदी केला तर त्यांना तोट्याचा सौदा वाटत नाही.