मुंबई : गेल्या काही वर्षांत ऑनलाइन व्यवहारांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग करायचं असो किंवा कुणाला पैसे पाठवायचं असो, आता लोक आपली सगळी कामं मोबाईलवरून मिनिटांत करतात. कारण यामुळे तुमचा वेळही वाचतो, तसेच हे तुम्ही कुठेही बसल्या बसल्या करु शकता. ऑनलाइन पेमेंटसाठी अनेक अॅप्स देखील उपलब्ध आहेत. यापैकी एक प्रसिद्ध आणि जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे Google Pay.
या ऍपवरुन दिवसाला लाखो लोकं व्यवहार करतात. परंतु तुम्ही हे पाहिलं असेल की, Google Pay वर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा आहे.
ज्यामुळे तुम्ही ठरावीक रक्कम 1 दिवसात ट्रान्सफर करू शकता. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना दिवसातून अनेक वेळा व्यवहार करणे आवश्यक आहे आणि Google Pay वर दिलेली दैनिक मर्यादा त्यांना कमी पडते. त्यामुळे अशा लोकांनी आता काळजी करण्याची गरज नाही त्याना आम्ही दोन मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने त्यांना पुन्हा असा प्रॉबलम येणार नाही.
तुम्ही व्यवहार करण्यासाठी एकापेक्षा जास्त पेमेंट अॅप वापरू शकता. जर तुम्हाला हे करायचे नसेल, तर आज आम्ही तुम्हाला दुसरा एक मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही Google Pay ने सेट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे भरू शकाल.
Google Pay द्वारे तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाखांपर्यंत रक्कम पाठवू शकता. याशिवाय, तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 10 व्यवहार करू शकता. तसेच एका दिवसात 2000 रुपयांपेक्षा जास्त पैशांची रिक्वेस्ट करता येणार नाही.
परंतु अनेक वेळा ग्राहकांसोबत असे घडते की, बँकेची मर्यादा असूनही ते Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीत, जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन तुमची बँक मर्यादा तपासू शकता.
शक्यतो Google Pay वर पेमेंट मर्यादा वाढवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, परंतु जर तुमचा व्यवहार बिझनेशीसंबंधीत असेल, तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून UPI मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता. याशिवाय, तुम्ही Google Pay च्या ग्राहक सेवेशी बोलण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील मदत घेऊ शकता. यामुळे तुमचा फायदा होईल.