Budget 2022: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी भेट, जाणून घ्या सरकारने काय केली घोषणा

देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज चौथ्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 

Updated: Feb 1, 2022, 03:40 PM IST
Budget 2022: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी भेट, जाणून घ्या सरकारने काय केली घोषणा title=

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज चौथ्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 

इलेक्ट्रीक वाहनांचा (Electric vehicles) ट्रेंड आता भारतात देखील दिसत आहे. देशाच्या विकासात ऑटो सेक्टरचं देखील योगदान आहे. त्यामुळे भारत सरकारने या क्षेत्रात आपलं लक्ष केंद्रीत केले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आधी पीएलआय योजना आणली होती. आता बजेट 2022-23 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रीक वाहन आणि इंफ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग व्यवस्था आणि बॅटरी स्वॅपिंगसह कनेक्टिविटी व्यवस्था आणखी चांगली बनवण्यासाठी घोषणा केली आहे.

बजेट 2022-23 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, सर्विस बॅटरी आणि एनर्जी, इनोवेटिव बिजनेस मॉडल्ससाठी मजबूत आणि उत्तम इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी खासगी सेक्टरला प्रोत्साहन दिलं जाईल. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या ईकोसिस्टममध्ये सुधार येईल.' 

भारतात लवकरच काही ठिकाणी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना प्रतिबंधित केले जाऊ शकते. असे संकेत ही त्यांनी दिले आहेत.