नवी दिल्ली : जपानी टूव्हीलर निर्माती कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने नव्या ग्रेझिया स्कूटर काही दिवसांपूर्वीच लाँच केली. ही टू-व्हीलर लाँच होताच २१ दिवसांत तब्बल १५ हजार युनिट्सची विक्री झालीये.
होंडाची ही टू व्हीलर ६ रंगात उपलब्ध करुन देण्यात आलीये.याची किंमत ५७,८९७(एक्स शोरुम दिल्ली) इतकी आहे. बाजारात या गाडीची टक्कर सुझुकी एक्सेसशी आहे.
होंडाची ही टू व्हीलर ८ नोव्हेंबरला लाँच झाली होती. त्यानंतर याची बुकिंग सुरु करण्यात आली होती.
इजिन - १२४.९ सीसी सिंगल सिलेंडर एचईटी इंजिन
पॉवर - 8.63 ps @6500rpm
पीक टॉर्क - 10.54nm @5000rpm
ट्रान्समिशन - व्ही मॅटिक
फ्रंट सस्पेंशन - टेलिस्कॉपिक फॉर्क
रेयर सस्पेंशन - सिंगल हायड्रॉलिक शॉक अॅबजॉर्बर
फ्रंट टायर - 90/90-12
रेयर टायर - 90/100-10
फ्रंट ब्रेक - cbs सह १९०mm डिस्क
रेयर ब्रेक - cbs सह १३०mm ड्रम
फ्यूएल टँक कॅपॅसिटी - ५.३ लीटर
वजन - १०७ किग्रॅ
किंमत - ५९,८२७(एक्स शोरुम दिल्ली)