मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 30, 2017, 06:25 PM IST
मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार title=

मुंबई : शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी मायक्रोमॅक्सनं या नव्या स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे.

मायक्रोमॅक्स भारत-5 या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh एवढी असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये मायक्रोमॅक्सनं भारत-2 हा या सीरिजमधला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्ट होता. तर या फोनची किंमत ३,४९९ रुपये एवढी होती.

सप्टेंबरमध्ये मायक्रोमॅक्सनं भारत-3 आणि भारत-4 हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या दोन स्मार्टफोनमध्ये 7.0 अॅण्ड्रॉईड नोगट आणि २२ भारतीय भाषा होत्या. भारत-3 हा स्मार्टफोन ४,४९९ रुपयांना आणि भारत-4 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांना होता.

ऑक्टोबरमध्ये मायक्रोमॅक्सनं बीएसएनएलसोबत भागीदारी करून भारत-1 हा स्मार्टफोन लॉन्च केला. रिलायन्स जिओ आणि एअरटेल कार्बनला टक्कर देण्यासाठी हा फोन लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनची किंमत २,२०० रुपये एवढी होती.

मायक्रोमॅक्सचे याआधीचे भारत सीरिजमधले स्मार्टफोन बघितले तर भारत-5 हा स्मार्टफोन शाओमी रेडमी 5A सारखाच असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहेत शाओमी रेडमी 5A चे फिचर्स

3000 mAhची बॅटरी, आठ दिवस चालण्याचा दावा

2GB रॅम 16 GB इंटरनल स्टोरेज, 3GB रॅम, 32 GB इंटरनल स्टोरेज

मायक्रोएसडी मेमरी कार्ड वापरून 128GB मेमरी वाढवता येणार

13 मेगापिक्सलचा रियर कॅमरा, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

3.5एमएमचा ऑडिओ जॅक, मायक्रो-युएसबी पोर्ट

2GB रॅम, 16GB इंटरनल मेमरी असलेला फोन 5,999 रुपयांना

3GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी असलेला फोन 6,999 रुपयांना

डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध

पहिल्या ५० लाख ग्राहकांना 2GB रॅम आणि 16GB इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनवर एक हजार रुपयांची सूट

7 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणी शाओमीच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.